वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
यवतमाळ :- कोरोनासारख्या माहामारीच्या सावटात मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांकरिता शाळा बंद राहिल्या आहेत.विद्यार्थी यांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने नाईलाजास्तव शाळा बंद ठेवल्या याचा आम्हा शिक्षकांना जाणीव आहे ,पण याचा विद्यार्थ्यांची शिक्षणावर विपरित परिणाम होत असल्याने ऑनलाईन शिक्षणाची मर्यादा लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता प्राथमिकच्या शाळा नियमित उपस्थितीचा सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव,सर्व शिक्षणाधिकारी यांना निवेदन पाठवून केली आहे. शासनाने ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पर्यायी माध्यमाद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिक्षकांनीही यासंबंधी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्याकरीता प्रयत्न केले मात्र ऑनलाईन शिक्षण हे त्यातील मर्यादा व विविध प्रकारची अनुपलब्धता लक्षात घेता नियमित औपचारिक शिक्षणात पर्याय ठरू शकत नाही, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचू शकत नाही मागील दीड वर्षापासून विद्यार्थ्यांची शैक्षणिक शिक्षण पूर्णपणे थांबले हे वास्तव आहे .2020-21 या शैक्षणिक सत्रात पहिलीत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली शाळा आणि आपले शिक्षकही पाहिले नाहीत हे वास्तव स्थिती आहे.प्राथमिकच्या वर्गातील बहुतांश विद्यार्थी भाषिक आणि गणितीय मूलभूत शैक्षणिक पायाच विसरले आहे, अशा परिस्थितीत आता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करण्याशिवाय तरणोपाय नाही.. असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शासनाने शाळा सुरू करणे खूप महत्त्वाचे आहे कारण मुलांना शाळा हा शब्द आठवत सुध्दा नाही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेऊन गुणवत्ता विकास होण्यासाठी नियमितपणे शाळा सुरू कराव्यात याबाबत राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी राज्य शासनाला निवेदन सादर केले.यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ श्रीमती कालिंदाताई पवार तथा शिक्षणाधिकारी यांना ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर, देवा वैद्य,आशना गुंडावार, विशाल ठोंबरे,महेश सोनेकर, संदीप शिरसागर यांनी निवेदन सादर केले आहे.


