विष्णुपंत भुतेकर भूमिपुत्र शेतकरी संघटना
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
जिल्ह्य़ातील खरीप पीक कर्ज वाटपासाठी सरकारी बॅका,सहकारी बॅंका आणि खाजगी बॅका असे मिळुन पीक कर्ज वाटप अपेक्षित असते. राज्यात एकुण चाळीस हजार पाचसे कोटीचे या वर्षांत खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या मधे खाजगी बॅका आयडीबीआय, आयसीआयसीआय,
अॅक्सिस बॅक यांना राज्यात चार हजार पाचसे कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पंरतु वाशिम जिल्ह्य़ासह राज्यातील खाजगी बॅकां शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळा टाळ करीत आहेत. जिल्हा प्रशासनाचे जिल्ह्य़ातील खाजगी बॅकावर नियंत्रण राहले नाही. खाजगी बँका शेतकऱ्यांना आतही येवु देत नाहीत. अनेक अधिकारी व शेतकऱ्यांना हे ही माहित नाही कि शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट खाजगी बॅकांना पण आहे म्हणून. कर्ज माफीत खोटे खातेदार व चुकीची माहीती दाखवून या आधी जिल्ह्य़ातील खाजगी बॅका व काही सहकारी बॅकांनी आपले उखळ पांढरे करून घेतलेले आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य ते उद्दिष्ट देऊन पीक कर्ज वाटपासाठी खाजगी बॅकांना बाध्य केले पाहिजे आसी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे.


