अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव : -शहरामध्ये जागोजागी अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच नगर पंचायत कडून नाली सफाई दरम्यान नालीतून काढण्यात आलेला घाण केर कचरा बऱ्याच ठिकाणी नाली लगद तसाच पडलेला आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी घाण व अस्वच्छता पसरली आहे. हि घाण लवकर साफ करून स्वच्छता निर्माण करा. अन्यथा रस्त्यावरील घाण,केर कचरा नगर पंचायत मध्ये टाकण्यात येईल. असा इशारा शहर वासियांनी दिला आहे. मागील दीड वर्षापासून शहरातील सामान्य जनता कोरोना संसर्गजन्य आजारामुळे त्रस्त झाली होती.आता शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच काही भागात नगर पंचायत ने नाली सफाई कामा दरम्यान नालीतील काढलेला घाण, केर कचरा नाली लगदच पडुन असल्याने अस्वच्छता वाढली आहे. घाणीमुळे शहरातील लोकांचा आरोग्यवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तरी नगरपंचायत ने तात्काळ शहरात स्वच्छता कार्य सुरू करावे.व शहरातील घाण, केर कचरा हटवून त्याची विल्हेवाट लावावी. अन्यथा मंगळवार दिनांक २४ जून २०२१ रोजी नागरिकांच्या वतीने शहरातील घाण केरकचरा व घंटा गाडी नियमित नसल्याने घरांमध्ये जमा झालेला केर कचरा नगरपंचायत आवारात आणून टाकण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे शहरातील नागरिकांचा वतीने नगरपंचायत देण्यात आला आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सुनिल शर्मा, रतन अघमकर सर, सचिन पांडे, अमेय अनसिंगकर, शेखअनवर, आशीष यादव, संदीप सावले, आदी,यांचा स्वाक्षरी आहेत. सदर निवेदनाचा प्रतिलीपी ग्राम विकास मंत्रालय, जिल्हाधिकिरी वाशिम, यांना पाठविण्यात आल्या आहेत.शहरामध्ये विविध भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे. त्यातच घंटागाड्या ची अनियमितता व नाली सफाई कामातील नाली मधुन काढलेला कचरा न उचलता नाली लगतच ठेवल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे.याकडे नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. नाईलाजास्तव शहर वासियांना आक्रमक भूमिका घ्यावी लागत आहे.सुनील शर्मा सामाजिक कार्यकर्ते मालेगाव.