सतिश मवाळ
ग्रामीण प्रतिनिधी कासारखेड
कासारखेड कळबेंश्वर थार सारशिव पेनटाकळी इ.परिसरामध्ये दी.१५ पासुन झालेल्या दमदार पाऊस मुळे पेरणी पुर्व मशागतीच्या कामाला पावसाने सवलत दिली नाही.त्यामुळे पेरणी पुर्व मशागतीचे कामे अपूर्ण राहिल्या मुळे पेरणी साठी शेतशिवार तयार झालेले दिसुन येत नाही.कधी दिवसा तर कधी रात्री वरून राजा हजरी लावत असल्याने . ट्रॅक्टर ची अवजारे शेतामध्ये चालत नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी योग्य शेत तयार करता येत नसल्याचे दिसून येत आहे.
बैलं ची शेती करणार्या शेतकऱ्यांची आठवण येत आहे.फार कमी शेतकऱ्यांजवळ बैलं आहेत . कमी कालावधीत वखरणे रोटाव्हटर पेरणी इ.कामे आर्थिक खर्च वाढला तरी यांत्रिक शेती करण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत.
यावर्षी प्रायव्हेट कंपन्या नी कमी भावात शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून बियाणे च्या अवाच्या सव्वा किमती वाढवून दिल्याचे दिसून येते आहे.मंजुरी व यांत्रिक अवजारे मध्ये ही मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.
बळीराजा पाउसची उघड पाहून
शेतामध्यिल खरिप हंगामातील पेरणी पुर्व मशागतीचे कामे करुन परिसरातील शेतकरी पेरणीला सुरवात करणार आहे.


