वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
यवतमाळ-: पेरणीचा हंगाम सुरु असतानाच जास्तीत जास्त पैसा कमावण्याच्या उद्देशातून बोगस बियाण्याची साठवणूक करून विकण्याच्या बेतात असणाऱ्या क्रुझर वाहन क्रमांक एम. एस.२७ बी. व्हीं.६३६२ या वाहनाने ३० क्विंटल कपासी सरकी नेत असताना गस्तीवर असणाऱ्या ग्रामीण पोलिसांना शंका आली असता त्या गाडीचा पाठलाग करून ताब्यात घेतले असता ४५ लाख किमतीचे बियाणे मिळून आले असल्याने जिल्हा कृषी अधिकारी पथकाला बोलावून संयुक्त कारवाई करण्यात आली.
जोडमोहा मार्गावरून ग्रामीण पोलिस गस्त घालत असताना बसस्थानकावर संशयास्पद क्रुझर वाहन उभे असल्याचे निदर्शनास आले असता त्या वाहनाची चौकशी करायची तोच वाहन चालक रवींद्र जनार्दन बघाटे रा. वटबोरी यांनी सुसाट वेगाने वटबोरी मार्गाने वाहन पळविले. त्यांचा पाठलाग करून वाहन थांबविले तर त्यात बोगस बिटी बियाणे असल्याचे आढळून आले. यावरून या वाहनास ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात येवून कृषी विभागास प्राचारण करण्यात आले. यात ३० क्विंटल सरकी व बोलगार्ड लिहिलेले खाली पाकिट असे एकूण ४५ लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार, पोलीस कर्मचारी तथा कृषी विभागाचे कोलपकर,जी. कृ. वि. अ. राजेंद्र माळोदे, बरडे, ढाकुलकर व कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांनी ही संयुक्तिक कारवाई केली