शकील खान
शहर प्रतिनिधी मूर्तिजापूर
मुर्तिजापूर :- स्थानिक नगर परिषद कार्यालय परिसर येथील भव्य अश्या दोन मजली नूतन इमारती मधे कोविड १९ केअर सेंटर चे उदघाटन व लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे हस्ते व आमदार हरीष पिंपळे , नगराध्यक्षा मोनालिताई कमलाकर गावंडे यांचे प्रमुख उपस्थिति मध्ये करण्यात आला, यावेळी उपनगराध्यक्ष सुनील पवार, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, मुख्याधिकारी विजय लोहकरे , वैधकीय अधीक्षक डॉ राजेन्द्र नेमाड़े, डॉ विजय वाडेकर आरोग्य सभापति आलिया तब्बसुम नासिरूद्दीन, द्वारकाप्रसाद दुबे, प्रशांत डाबेराव, विनायक गुल्हाने,रवि इंगळे, सुनील लशुवानी, सर्व नगरसेवक, समाजसेवक कमलाकर गावंडे, संदीप जळमकर, नासिरभाई,गजानन नाकट, राहुल गुल्हाने, देवीदास गोले, कैलास महाजन व शहरातील गणमान्य लोग उपस्थित होते. मा आमदार हरीष पिंपळे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा शाल श्रीफल व संत गाडगे बाबांची मूर्ति देऊन स्वागत सत्कार केला व सदर कोविड सेंटर उभारणी करिता सर्व 450 शिक्षक वर्ग यांनी 4 लाख 50 हजार रु, संत नामदेव महाराज संस्था जांभा बु. यांनी 2 लाख, सर्व नगरसेवक पदाधिकारी यांचे कडून बोअरवेल व इलेक्ट्रिकल फिटिंग इत्यादि कामा करिता 3 लाख रु व इतर दात्यान कडून 50 हजार रु असे 10 लक्ष निधि लोकसहभागातुन सदर सेंटर उभारणी करण्यात आल्याचे सांगितले , भविष्यात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता सुसज्ज असे कोविड सेंटर ची पाहणी करुण जिल्हाधिकारी यांनी समाधान व कौतुक व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा मोनालिताई गावंडे यांनी मदत करणाऱ्या सर्व शिक्षक वर्ग , स्वयंसेवी संस्था व सर्व पक्षाचे पदाधिकारी व शहरातील दानशूर व्यक्ति यां��