गोलाकर्जी ते छल्लेवाडा वळणावर समोरासमोर दोन दुचाकीत झाले होते अपघात.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:- अहेरी तालुक्यांतील सिरोंचा मार्गावरील गोलाकर्जी-छल्लेवाडा समोरील वळणावर दोन दुचाकीत एकमेकांत जबर धडक दिली असुन अर्कापली येथील रहिवासी असलेले दिनेश आत्राम वय 24,रामशाई सोयाम वय 65 व नागअर्जुन आत्राम वय 12 गाडी नंबर MH -33A 1506 नी 12 वर्षांच्या मुलाला गुन्डेपली शाळेत नेत होते.तर विरुद्ध दिशेनी एटापली येथील रहिवासी असलेले अरुण तेलकुंटावार MH -33-A -2370 या दुचाकीने सिरोंचा कडे जात होते.गोलाकर्जी-छल्लेवाडा वळणावर या दुचाकीचे अपघात झाले आहे.विशेष म्हणजे नेहमी सर्वांच्या मदतीला धावून जाणारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार सिरोंचा दौऱ्यावर जात होते. घटनास्थळी बघता कोणीच नव्हते क्षणाचा विलंब ना करता रुग्णवाहिका बोलवून स्वतः लहान मुलाला रुग्णवाहिकेत टाकून सर्वांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.यावेळी जूलेख शेख,राकेश सड़मेक आदिंनी सहकार्य केले.