ग्रामीण प्रतिनिध
शरद वालसिंगे अकोट
अकोट : उपविभाग येथुन अकोट शहरात थकबाकी वसुली बाबत जनजागृती करण्याकरिता मोटर सायकल रॅली काढण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात वीज बिल थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक पारिस्तिथी नाजुक असल्याने सर्व ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन रॅलीत करण्यात आले.रॅली चे उदघाटन श्री.उईके कार्यकारी अभियंता, महावितरण अकोट विभाग, अनिल कराळेअतिरीक्त कार्यकारी अभियंता श्री.गोपाल अग्रवाल उपकार्यकारी अभियंता उपविभाग यांनी केले, अकोला नका,छत्रपत्री शिवाजी चौक,संत नरसिंग महाराज रोङ,यात्रा चौक,बारगनपुरा ,धारुळी वेस,बस स्टॅड,सिंधी कॅम्प मोटर सायकल रॅली वर विज बिल भरा,असा संदेश फलक घेऊन रॅली काढण्यात आली यावेळी अकोट शहर वितरण केंद्रातील सर्व शाखा अभियंते /जन्मित्र /बहाय्य स्रोत कर्मचारी रॅलीत सहभागी झाले.