किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
समाजातील उपेक्षितांना अपेक्षा विरहित मदत करणा-यांचा सन्मान केल्याने त्यांना आणखी उर्जा मिळते.
अँड.मोहम्मद रेहान
(विधी सल्लागार सा. अकोला संवाद)
साप्ताहिक अकोला संवाद च्या वतीने कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अनेकांना अनमोल अशी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली अशांना सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून नुकतेच सन्माननीय करण्यात आले होते परंतु काही कारणास्तव अनेक मान्यवर उपस्थित होवू न शकल्याने त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस पातुरला आले असता संयोजकांनी त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.सोबतच देशाच्या संरक्षणासाठी अठरा वर्ष परिवाराला सोडून सिमेवर लढून आपली सेवा दिली व परत गावात आलेल्या माजी सैनिक रविंद्र श्रीनाथ यांचा ही सन्मान केला.याप्रसंगी अँड.मोहम्मद रेहान (विधी सल्लागार सा. अकोला संवाद), मोहम्मद फरहान अमीन संपादक सा. अकोला संवाद) आदि उपस्थित होते.