अकोला : एल. आर. टी. कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोला येथील एन. सी. सी. विभागाच्या कॅडेट्सनी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त शासकीय रुग्णालयाच्या परिसरामध्ये एड्स या आजाराविषयी जनजागृती केली. ज्युनियर अंडर ऑफिसर वैष्णवी ढवळे हिने एड्स या आजाराचे कशाप्रकारे संक्रमण होतो, याविषयी माहिती दिली. सार्जंट रोहिणी देव हिने एच. आय. व्ही या विषाणूचा शरीरावर होणारा प्रभाव याबद्दल माहिती दिली. तसेच कॅडेट प्राजक्ता नारखेडे व कॅडेट ऋषिकेश पटेल या दोघांनी या आजाराची लक्षणे तसेच हा आजार झाल्यास कशी काळजी घ्यावी हे स्पष्ट केले. यावेळी राजू गवई, आर. आर. मोरे, पुरुषोत्तम नांदुरकर, किसन गायकवाड, रवींद्र चक्रे, बी.एस.एफ. चे जवान बी. एस. एफ. स्थापना दिवसानिमित्त उपस्थित होते. या सर्व जवानांनी व हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कॅडेट्सचे कौतुक केले. जागतिक एड्स दिनानिमित्त शासकीय रुग्णालयाच्या परिसरात एड्स या आजारा विषयी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जनजागृती कार्यक्रमाला बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र जैन, मानद सचिव पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजित परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी सुद्धा शुभेच्छा देऊन कॅडेट्सचा आत्मविश्वास वाढविला. या कार्यक्रमात सिनिअर अंडर ऑफिसर आकाश चौव्हान, ज्यूनियर अंडर ऑफिसर वैष्णवी ढवळे, ज्यूनियर अंडर ऑफिसर अनुराग भिरड, सार्जंट रोहिणी देव, सार्जंट विपुल उबाळे, कार्पोरल नेहा बुंदेले, कार्पोरल दिपक अमृतकर, कार्पोरल शाम ढोरे, कार्पोरल शरयु शिंदे, कार्पोरल रोहित डिगे, कार्पोरल जयश्री हरसुलकर, लान्स कार्पोरल शिवम देशमुख, लान्स कार्पोरल प्राची सदांशीव, कॅडेट प्राजक्ता नारखेडे, कॅडेट वैभव कारसकार, कॅडेट ऋषिकेश पटेल, कॅडेट कार्तिक लांडगे, कॅडेट सागर वानखडे, कॅडेट हर्षल पाल, कॅडेट सर्वेश धांडे, कॅडेट जय नांदवडे, कॅडेट ऋतिक आगरकर, कॅडेट ऋषिकेश शेलार, कॅडेट तेजस डांगे, कॅडेट सूरज सरकटे, कॅडेट अनिकेत शिरसागर, कॅडेट रोशन इंगोले, कॅडेट प्रणव इंगोले, कॅडेट अभय पारदी, कॅडेट मीनल रेड्डी, कॅडेट सुहानी गवई अश्या अनेक एन. सी. सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.