किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : बिकट परिस्थितीशी झुंज देणाऱ्या निराधार विधवा महिलेच्या कुटुंबाचे स्वप्न होईल साकार …
पुणे येथील भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व निष्पक्ष, निर्भिड पत्रकार किरण कुमार निमकंडे यांच्या जन्मदिनी भूमिपूजन सोहळा संपन्न..!
‘आपलं स्वतःचं हक्काचं एक छोटंस घर असावं असं प्रत्येकाचे स्वप्न असतं.. अशाच प्रकारचं स्वतःच्या घराचे स्वप्न उराशी बाळगून अठराविश्वे दारिद्र्याशी झुंज देणारं आगिखेड येथील निराधार विधवा श्रीमती कांताबाई तवंर यांच्या कुटुंबीयांनी आपल्या प्रयत्नांची खुप पराकाष्ठा केली परंतु शेवटी त्यांच्या नशिबी अपयशच येत होतं,एवढेच नाही तर निसर्गाने सुद्धा त्यांच्या नशिबाची थट्टा मांडून यावर्षी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने त्यांचे दगड मातीचे घर जमीनदोस्त केले,सुदैवाने त्यांच्या परिवारातील जीवित हानी टळली.अकोला जिल्ह्याच्या पातुर तालुक्यातील आदिवासी भागातील ग्राम आगिखेडच्या राजपूत समाजातील तवंर कुटुंबाच्या दुःखद कहाणीची वार्ता सर्वदूर तालुका भर पसरली.

यावेळी पातुर तालुका विकास मंचने निराधार तवंर कुटुंबाची दखल घेतली व या कुटुंबाला शासनाकडुन घरकुल मिळवून देण्याचे प्रयत्न केले परंतु या परिवाराकडे असलेल्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे त्यांच्या घरकुलाला विलंब होत होता अशावेळी पातुर तालुका विकास मंचने त्या परिवारास राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर च्या माध्यमातून त्यांचे पडलेले घर पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन दिले होते.त्याची पुर्तता म्हणून राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी तसा प्रस्ताव संघटनेच्या पदाधिकाऱ्यां पुढे मांडला व तो मंजूर करून घेतला.तसेच त्यांच्या पुढाकाराने पुणे येथील भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनीही यात लाख मोलाची मदत करून ख-या अर्थाने या कुटुंबाच्या घरकुलासाठी एक हात मदतीचा दिला आहे.घरकुलाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पातुर तालुका विकास मंचचे किरण कुमार निमकंडे व आमदार महेश दादा लांडगे यांच्या जन्मदिनी संपन्न झाला.
आगीखेडच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.पुनमताई उगले,उपसरपंच नितेश हिवराळे,ग्रा.पं.सदस्य संतोष लांडकर,पातुर येथील राजपूत समाजातील जेष्ठ नागरिक ठाकूर रमेश सिंह बायस,ठाकूर दिलीप सिंह बायस यांच्या शुभहस्ते भुमीपूजन करण्यात आले.
याप्रसंगी पातुर तालुका विकास मंचचे संयोजक ठाकूर शिवकुमार सिंह बायस,पत्रकार किरण कुमार निमकंडे,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पातुर विभाग प्रमुख धारकरी विजय राऊत,प्रा.शंकर गाडगे,डॉ विलास हिरळकार,प्रल्हाद गवई,विजू भाऊ अत्तरकार,अर्जुन लसनकार,सतिश बन्सोड,अनिल अत्तरकार,देविदास पारधी,पुंडलिक अत्तरकार,चिंदाजी अत्तरकार, रंणजीत बायस,उमेश गिरी,विशाल काळे,किसन जामोदे,वामन अत्तरकार, प्रल्हाद लांडकर,सुनिल अत्तरकार, रमेश अत्तरकार,हरिश्चंद्र बन्सोड,हिम्मतराव लांडकर, गणेश गिरगिरी, विठ्ठल अत्तरकार,मनोहर इंगळे,सहदेव उगले,विवेक उगले,शरद राजनकर,देवराव अत्तरकार,विनोद अत्तरकार, रमेश लांडकर,चिंदाजी वाघ, गजानन राव,हिम्मत घोळसकार,शंकर जामोदे, निलेश उगले, गजानन गाडगे,रामेश्वर चिंचोलकार,शशिकांत उगले,गुलाब इंगळे,सुधाकर जवंजाळ,अरूण अत्तरकार,राजू अत्तरकार,रविकुमार खांबलकर, सुनिल गिरी,ओंकार गिरी,राहुल उगले, डॉ.विलास हिरळकार,रंणजीत बायस,आदी मान्यवर तसेच आगिखेड येथील बहुसंख्य ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.पातुर तालुका विकास मंचच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहेत.


