किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : येथील शहा बाबू कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथे शिकणारी कु अपशा रफत कलम पठाण हिने नुकत्याच झालेल्या नीटच्या परीक्षेत 720 पैकी 593 गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले व एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरली हिच्या या यशाने पातूरच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा रोवल्या गेला. कु अपक्षा रफत कलम पठाण ही अतिशय सामान्य घरातील विद्यार्थिनी असून तिचे वडील भंगार विक्रीचा व्यवसाय करतात आणी अशातच तिने घवघवीत यश संपादन केले ही शहर व तालुक्यातील सर्वांसाठी गौरवास्पद बाब आहे.

तिच्या या नेत्रदीपक यशामुळे पातुर तालुका विकास मंचच्या वतीने तिचा पातुर येथील सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारे व पातुर येथील विविध समस्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असता उपोषणाच्या मंचावरून ठाकूर शिवकुमार सिंह बायास यांनी कु.अपशा रफत कलम पठाण हिचा पातूर तालुका विकास मंच चे किरण कुमार निमकंडे व आमदार महेश लांडगे यांच्या जन्मदीनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अपशाचा यथोचित सत्कार केला व तिच्या भावी उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या वेळी जेष्ठ नागरिक ठाकूर रमेश सिंह बायस,ठाकूर दिलीप सिंह बायस, वस्ताद सुरेश श्रीनाथ,पातुर तालुका विकास मंचचे ठाकूर शिवकुमार सिंह बायस,किरणकुमार निमकंडे,प्रा.शंकर गाडगे,डॉ.विलास हिरळकार,मधुकर राखोंडे,रंणजीत गाडेकर,गणेश गाडगे, किशोर यादव,प्रल्हाद गवई,सैय्यद मुशर्रफ,अर्जुन लसनकार,गणेश राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते.


