गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : पोलीस स्टेशन तेल्हारा येथे दि २८/११/२०२१ रोजी १५.०० वा दरम्यान ठाणेदार ज्ञानोबा नाथराव फड पोस्टे तेल्हारा आपल्या सहकार्यासह पोलीस स्टेशन ला हजर असताना ठाणेदार ज्ञानोबा फड याना गुप्त माहीती मिळाली की ग्राम कालखेड ता शेगाव जि बुलढाणा येथे राहणारा अक्षय चौखंडे हा अवैध रित्या देशी कटटा पिस्टल अग्नीशस्त्र जवळ बाळगुन वरवट बकाल ता संग्रामपूर गावा कडुन तेल्हारा येथे मोटर सायकल ने येणार आहे अशा माहिती वरून माळेगाव बाजार ता तेल्हारा येथील वरवट बकाल कडुन येणा-या दानापुर टी पांईट च्या काही अंतरावर दबा धरून बसलो माहीती प्रमाणे नमुद अक्षय शेषराव चोखंडे वय २३ वर्ष रा कालखेड ता शेंगांव जि बुलडाणा हा त्याचे मोटार सायकल क एम एच २८ ए ए ७६९० ने आला असता त्यास पोस्टाफ चे मदतीने लपछ छपत जावुन छीताफीने पकडुन त्याची अंग झडती घेतली असता त्याचे पॉन्ट मध्ये कमरे जवळ एक लोखंडी धातुचा देशी कटटा त्याला काळ्या रंगाचे फायबर ची उभा लाइन ची पीस्टल ग्रीफ दोन्ही बाजुनी दिसुन आली असलेला देशी कटटा (पीस्टल, अग्नीशस्त्र) की अं २५००० रू व जुनी वापरती हीरो होंडा प्रो मोसा क एम एच २८ ए ए ७६९० की अं ३०००० रु एकुण ५५००० रु मुददेमाल जागीच मोजमाप करून घटनास्थळ जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला आरोपी नामे अक्षय शेषराव चोघंडे वय २३ वर्ष रा कालखेड ता शेगांव जि बूलडाणा हा विनापरवाना अवैध्यरित्या देशी कटटा पीस्टल अग्नीशस्त्र बाळगतांना मीळुण आल्याने पोस्टेला अपनं ४४१/२०२१ कलम ३, २५ आर्म अक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आज रोजी मा न्यायालयात आरोपीस हजर केले असता मा न्यायालयांने आरोपीस एक दिवसांचा पीसीआर मंजुर केला आज रोजी तपासा दरम्यान अटक आरोपीस विचारपुस केली असता आरोपीने ज्याचा कडुन पीस्टल विकत घेतले आहे त्याची नावे १)रमेश रेमा जमरा वय २२ वर्ष रा राजुरा बु ता जळगांव जामोद जि बुलडाणा २) जयराम कैलास मोहता वय १९ वर्ष चारबन ता जळगांव जि बुलडाणा यांना अटक केली आहे सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सो मा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनीका राउत मॅडम अकोला, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी अकोट रेतु खोकर मॅडम उपविभाग अकोट यांचे मार्गदर्शनखाली मा सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड सा पोउपनी गणेश कांयदे तसेच गणेश सोळंके, पो ना अनिल शिरसाट, पोकॉ रोशन ठाकुर पोकॉ हरीशंकर शुक्ला, पोकॉ अमोल नंदाने, पोकॉ निकेश सोळंके पोलीस स्टेशन तेल्हारा यांनी कार्यवाही केली. पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड करत आहेत