शकील खान
शहर प्रतिनिधी मूर्तिजापूर
मुर्तिजापूर – पंचायत समिती मुर्तिजापूर गट ग्रामपंचायत दापुरा अंतर्गत येत असलेले शिरताळा गाव हे विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र दिसत आहे मुर्तिजापूर वरून हिरपूर मार्गे हिवरा कोरडे या रोडवरून सिरताळा गाव आत मध्ये एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे गावात व गावाबाहेर जाणे – येणे करिता मुख्य रस्ता एकच आहे त्या रस्त्यावरून धड पायी सुध्दा चालत जाता येत नाही मोठे – मोठे खड्डे पडलेले आहेत आणि आता पावसामुळे डबके साचले आहे खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डे हे तेथील नागरिकांना कळेनासे झाले सध्या सुरू असलेली कोरोना आजाराची महामारी यातच प्राथमिक आरोग्य केंद्र जामठी बु अंतर्गत उपकेंद्र बोरटा च्या माध्यमातून सदर गावामध्ये कोरोना प्रतिबंधक लसिकरन शिबीराचे आयोजन करण्यात आले असता लसीकरण करण्याकरिता गावात जाण्यासाठी उपकेंद्रातील कर्मचारी आरोग्य सेवक,आरोग्य सेविका यांना कमालीची कसरत करून गावात जाऊन लसीकरण यशस्वीपणे पार पाडली परंतु गावामध्ये जर का एखादा अत्यावश्यक असलेला रुग्ण असला तर त्याला रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका बोलावणे शक्य होणार नाही किंवा गावातील कुठले वाहन घेऊन जाता येणार नाही एवढी बिकट परिस्थिती आहे त्यासाठी पदाधिकारी व संबंधित प्रशासनाने ,ग्रा प ने बिकट परिस्थिती कडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून होणाऱ्या गैरसोयीपासून मुक्तता देण्यात यावी अशी समस्त नागरिकाची मागणी आहे


