कोरोना काळात प्रतिदिन 500 रू.प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची मागणी.
15 जून 2021 पासून राज्यव्यापी संप.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर (१५ जून)- महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समिती वतीने राज्यव्यापी 15 जून 2021 पासून बेमुदत संप करण्याचा इशारा राज्य सरकार दिला होता त्या अनुषंगाने आज दीं.15 जून रोजी आयटक राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी तीव्र नारेबाजी करीत जिल्हा कचेरी समोर विशाल धरणे आंदोलन केले.
15 जून पासून कोरोना कामा सहित सर्वच कामावर बहिष्कार राज्यातील 68 हजार आशा व 4 हजार गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी पुकारला आहे. आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेशजी टोपे यांनी मंत्रालयात च्या दालनात मुंबई येथे आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या पदाधिकारी बैठक 11जून रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान सहसंचालक मा. महेश बोटले, राज्य अभियान कार्यक्रम अधिकारी अनिल दक्षिणे उपस्थित होते. आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने कॉम्रेड राजू देसले, कॉ. विनोद झोडगे ,कॉम्रेड एम ए पाटील, उपस्थित होते. बैठकीत आशा व गट प्रवर्तक मागण्या वर सखोल चर्चा करण्यात आली. आशा ना दरमहा राज्य व केंद्र सरकारच्या वतीने 2- 2 हजार रुपये मिळतात मात्र महाराष्ट्र त बहुसंख्य ठिकाणी 1650 रु टाकले जमा होत आहेत. कपात होत आहे. संपूर्ण 4 हजार रुपये मिळतील याकडे प्रशासन ने दखल घ्यावी कार्यवाही करावी असे आदेश आरोग्यमंत्री नि दिले. राज्यात आरोग्यवर्धिनी चे काम सुरू असतांना आरोग्य उपकेंद्रे मध्ये( CHO) समूह आरोग्य अधिकारी नियुक्त नसल्यास केलेला कामाचा मोबदला आशा ना मिळत नाही. हे निदर्शनास कृती समितीने आणून दिले. आरोग्य मंत्री महोदय यांनी तात्काळ राज्यभर सि एच ओ भरण्याचे आदेश दिले. व मोबदला दिला जाईल असे प्रतिपादन केले. आशा व गट प्रवर्तक ना मार्च 2020 पासून कोरोना काम करून घेतले जात आहे. कोरोना कामामुळे आशा ना इतर 72 कामे करण्यास वेळ मिळत नाही. आशा ना फक्त कामाचा मोबदला दिला जातो. त्या मुळे आशा चे नुकसान होत आहे. केंद्र सरकार आशा ना फक्त दरमहा 1हजार रुपये म्हणजे दिवसाला 33 रु रोज 8 ते 12 तास काम करून देत आहे. इतर कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दरमहा देत आहे. अल्प मानधन वर काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तक वर अन्याय का? जे काम आशा करतात त्या कामाचे रिपोर्टिंग गट प्रवर्तक करावे लागते. गट प्रवर्तक ना सुध्दा कोरोना कामासाठी ऑनलाइन काम, कोरोना सेंटर वर 8 तास ड्युटी लावली जात आहे. म्हणून कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता आशा व गट प्रवर्तक ना प्रतिदिन 500 रु द्या. अशी मागणी करण्यात आली. यावरती आरोग्य मंत्री यांनी या विषयी मा. मुख्यमंत्री महोदय शी बोलून लवकरच निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन दिले. बैठकीत मिळत असलेल्या आशा ना मानधना बाबत थेट उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्या च्या फोनवर त्या गावातील आशा ला फोन लावायला आरोग्यमंत्री नि सांगितला तेव्हा त्या आशेने दरमहा 4 हजार रुपये मिळत नाही. 3500 रु मिळत आहेत. कपात होत आहे. सांगितल्यावर अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली. आशा कर्मचारी घरोघरी जाऊन कोरोना अँटिजेंट टेस्ट करतील अशी घोषणा आरोग्यमंत्री ने केली होती. मात्र सदर काम आशा नि नाकारले होते. कृती समितीने पत्र लिहून आशा हे काम करणार नाहीत भूमिका घेतली होती. या बाबत राष्ट्रीय आरोग्य अभियान सह संचालक महेश बोटले यांनी पत्र काडून कोरोना टेस्ट चे आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी(CHO) करतील असे निर्देश दिले आहेत. त्या मुळे आशा वर चुकीच्या पद्धतीने लादलेले कामातून मुक्तता झाली आहे.
आशा व गट प्रवर्तक ना फक्त कामा प्रमाणे मोबदला मिळतो. विना मोबदला काम सांगू नये. मोफत कामे स्रियां कडून करून घेऊन आर्थिक शोषण शासनाने करू नये , कोरोना काळात आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना प्रतिदिन 500 रू.देण्यात यावे,शासकीय सेवेत सामावून घ्यावे,किमान 21000 रू.वेतन देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या परंतु आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुसतेच आश्वासन दिले त्यामुळे आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी नाराजी व्यक्त करून राज्यव्यापी संपाचा निर्णय घेतला त्या निमित्त आज चंद्रपूर येथे तीव्र आंदोलनं करून कलेक्टर मार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले व सरकार जो पर्यंत योग्य निर्णय घेत नाही तो पर्यंत महाराष्ट्र सह चंद्रपूर जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक बेमुदत संपावर राहतील अशा इशारा आयटक चे राज्य सचिव विनोद झोडगे,संतोष दास, प्रा.नामदेव कनाके ,प्रदीप चीताडे,राजू गैन वार,ममता भिमते,शालू लांडे,निकिता नीर्,वर्षा घुमे,यांनी दिला या मोर्चात जिल्हाभरातील आशा वर्कर व गट प्रवर्तक महिला उपस्थित होत्या.
कॉम्रेड विनोद झोडगे
राज्य उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना(आयटक)
मो 7875439357


