सतिश मवाळ
ग्रामीण प्रतिनिधी कासारखेड
मेहकर तहसिलदार डॉ.संजय गरकळ व दिव्यांग लस अभियानाचे मेहकर तालुक समन्वय अधिकारी प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांची मेहकर तहसिल येथे चर्चा झाली असता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे सद्या वय वर्ष 45 वरील नागरिकांना लस देणे सुरू आहे सर्व लसीकरण केंद्र,ग्रामीण रुग्णालय संबंधितांना लस देताना दिव्यांग व्यक्तीस प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात येतील, गाव, शहर भागात कार्यरत कर्मचारी शिक्षक,तलाठी,ग्रामसेवक,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस ,व आरोग्य विभागाचे डॉकटर, नर्स,कर्मचारी यांनी केंद्रावर दिव्यांग व्यक्तीस लसीकरण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात येतील. आणि ज्या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती संख्या अधिक असेल तेथे cump बाबत विचार आरोग्याधिकारी चर्चा केल्या जाईल असे तहसीलदार डॉ संजय गरकळ म्हणाले. लसीकरण बाबत पत्र प्राचार्य शेळके यांनी तहसिलदार यांना देवून चर्चा केली. मेहकर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना कोरोना महामारी पासून सुरक्षित करण्यासाठी सक्षमतेने लसीकरण होणे अत्यावश्क असल्याने जिल्हा नोडल ऑफिसर मनोज मेरत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी हिवरा आश्रम येथील प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांची मेहकर व लोणार तालुका समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
प्राचार्य शेळके यांनी दिनाक 14 जून रोजी मेहकर येथे नगरपालिका दिव्यांग विभागाचे प्रमुख पवन भादुपोता संपर्क करून मेहकर शहर दिव्यांग व्यक्ती लसीकरण सक्षम तेने करण्याबाबत सांगितले. दिव्यांग कोरोणा टेस्टिंग,उपचार व लसीकरण बाबत प्राधान्य क्रमाने काम करण्याबाबत व कोरोना टेस्टिंग साठी जागृती व लसीकरण केंद्रावर प्रथम प्राधान्य देण्यात येतील.अशी चर्चा झाली.
पहिल्या टप्प्यात 45 वर्षां वरील सर्व दिव्यांग व्यक्तीचे 100 % लसिकरन करताना दिव्याग व्यक्तींना प्रथम प्राधान्य देण्याचे विचार विनिमय झाला.
यानंतर पुढील टप्पा 18ते45 वयोगट साठी ज्या वेळी लस येतील त्याही वेळी दिव्यांगाना प्राधान्य देता येईल. तसेच ग्रामपातळीवर शिक्षक,आशा वर्कर, अगंणवाडी सेविका , मदतनीस, ग्रामसेवक, आरोग्य विभाग कर्मचारी..


