गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा शहरातील स्थानिक इंदिरा नगर येथे एकता मंडळद्वारा दोन दिवसीय मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तेल्हारा शहरातील श्री हनुमान मंदिर सभागृह इंदिरानगर तेल्हारा येथे दिनांक २२/११/२०२१ व मंगळवार दिनांक २३/११/२०२१ पर्यंत दोन दिवसीय मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये 156 ऑनलाइन,ऑफलाईन नोंदणी तसेच दुरुस्ती करीता नागरिकांनी नोंद केली,अशी माहिती एकता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ तेल्हारा सचिव गजानन आकाराम भाऊ गायकवाड यांनी सांगितले आहे, यावेळी एकता मंडळाचे शिवा अम्रुतकार,सनी सोनोने,अभीजीत गोमासे,सचीन मोहोड,बाबुलाल चाफे हे कार्यकर्ते ऊपस्थीत होते…