वाशिम दि.23 : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा वर्ग 6 वीच्या सन 2022-23 च्या प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली आहे.परंतु वर्ग पाचवीमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा सन 2022 वर्ग 6 वीचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने 17 नोव्हेंबरपर्यंत भरले आहेत व प्रवेश अर्ज भरतांना शाळेची माहिती असलेले प्रमाणपत्र फक्त पालकांच्या सहीने अपलोड केलेले आहे, त्यांनी त्या प्रमाणपत्रावर विद्यार्थी सध्या पाचव्या वर्गामध्ये ज्या शाळेत शिकत असेल त्या शाळेतील मुख्याध्यापकांची सही व शिक्का घेऊन प्रमाणपत्राची प्रत जवाहर नवोदय विद्यालय,वाशीम येथील कार्यालयीन वेळेत जमा करावी. यापुढेही विद्यार्थी व पालक नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2022 वर्ग 6 वीचा अर्ज करतील, त्यांनी सुधारित प्रमाणपत्र अपलोड करून ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021आहे .अर्ज https:cbseitms.nic.in/registration Class6 या संकेतस्थळावर भरता येईल. अधिक माहितीसाठी हेल्प डेस्क नंबर 07252233002,9511607486(उपप्राचार्य),9421351699(ए.पल्लेवाड),8788356190,9604567090,9421494337,9422826813 आणि 9423722811 या भ्रमणध्वनीवर संपर्क करू शकता.