अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : पातूर येथे कृष्णा बोंबटकार यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अनाठायी खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांना केले पुस्तक वह्यांचे व शालेय साहित्याचे वाटप सामाजिक कार्यकर्ते कृष्णा बोंबटकार यांचा सेवाभावी उपक्रम पातूर येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृव आई तुळजाभवानी मित्र मंडळ गुरुवार पेठ चे अध्यक्ष कृष्णा बोंबटकार याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाचा इतर वायफट खर्च न करता शालेय साहित्य वाटप करून करण्यात आला आहे. यावेळी पातूर शहरात कृष्णा बोंबटकार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून गरजवंतांना यावेळी मदत करण्यात आली आहे.तसेच विविध मंदिरांमध्ये जाऊन दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.कृष्ण भटकर यांच्या उज्वल भविष्य आणि आयुष्य करता त्यांचे मित्र परिवाराने प्रार्थना केली आहे. यावेळी कृष्णा बोंबटकार सुधाकर शिंदे, राहुल वाघमारे,राहील भाई, नईम भाई , राज पांडे, सागर हरणे ,अतुल भांगे, प्रसाद बीडवाले, रितेश भवाने सर्व मित्र परिवार यांचा पुढाकार होता.