स्पर्धेत अनेक अादिवासी बांधवांनी घेतला सहभाग.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिंधी गडचिरोली.
गडचिरोली/सिरोंचा:-जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास उपविभागीय पोलीस कार्यालय हद्दीतील पोलीस स्टेशन सिरोंचा येथे भव्य रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनातून उपविभागीय स्तरावर भव्य रेला नृत्याचे आयोजन करण्यात आले.घेण्यात आलेल्या रेला नृत्य स्पर्धेत विजेत्यांची निवड करण्यात आली.यात प्रथम विजेते विर बाबुराव शेडमाके रेलानृत्य संघास मान्यवरांच्या हस्ते 7000 रू रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.द्वितीय विजेते चिटुर रेलानृत्य संघ पोस्टे असरअल्लीस 5000 रु.रोख तसेच तृतीय विजेते बिरसा मुंडा रेला नृत्य संघ येनलाया उपपोस्टे बामणीस 3000 रु.रोख बक्षीस देण्यात आले.रेला नृत्य कार्यक्रमाला आलेल्या सर्व नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.रेला नृत्य कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस कार्यालय व पोलीस स्टेशन सिरोंचाचे कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)