पोलीस -नक्षल चकमकीत पोलीस जवानांनी 27 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली-: महाराष्ट्र छतीसगड सिमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल ग्यारापत्तीच्या मरर्दनटोला जंगल परिसरात दि.13 नोव्हे रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत पोलीसांनी मिलींद तेलतुबडे सह 27 नक्षलींना कंठस्थान घातले होते.झालेल्या चकमकीमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.त्यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्याच्या स्म्रुतीसाठी 27 नोव्हे 021 रोजी महाराष्ट्र,तेलंगाना,छत्तीसगड,आेडीसा,मध्यप्रदेश व आध्रप्रदेश या सहा राज्यात नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले आहे.असे आवाहन नक्षलवाद्याचा सेंट्रल प्रवक्ता अभय याने तिन पानाचे पञक काढुन केले आहे.13 नोव्हे रोजी झालेल्या चकमकीत सेंट्रल कमिटीचा मेंबर मिलींद तेलतुंबडे याच्या सुरक्षा पथकातील महत्वाचे सदस्य असलेले भगत आणी योगीता हिचा म्रुत्यु झाल्याचे पञकात सांगितले आहे.तसेच पोलीस जवानांचे नक्षलवाद्यावरिल हल्ले खुप मोठ्या प्रमाणात वाढले असल्याची कबुलीही पञकात केली आहे.हे पञकाच्या वरती भारत की कम्युनिस्ट पार्टी(माआेवादी)केंद्रीय कमेटी असे लिहीले आहे.