अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव मेहकर राज्य महामार्गावरील ना. ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजार मध्ये काल ता 15 जूनच्या पहाटे 3.45 वाजताच्या दरम्यान धाडसी चोरीची घटना घडली अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलचा धाक दाखवुन ऑफिसमधुन १२ लाख ५६ हजार रूपये लुटले. मार्केटमधिल ऑफीस समोर झोपलेला हमाल रोशनकमार परमानंद ठाकुर रा बिहार राज्य यास पिस्तुलाचा धाक दाखवून मार्केट मधिल ऑफिस चे शटर्स व दरवाजे तोडून ऑफिसमधील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या ड्रावर मधुन १२लाख ५६ हजार रूपये रोख रक्कम व सिसिटिव्ही फुटेज स्टोअर करण्यासाठी लावलेला २० हजार रुपये किमतीची डिवीआर मशिन धाडसी चोरी करून चोरटे पसार झाले.मालेगाव येथील मालेगाव ते मेहकर रोडवर ना ना मुदडा कृषी उत्पन्न बाजार असून या ठिकाणी परीसरातील शेतकऱ्यांचा तुर मुंग,उडीद सोयाबिनसह इतरही शेतमाल मोठया प्रमाणात घेतल्या जातो. त्यामुळे या ठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते.सदर ठिकाणी बिहार राज्यातील, स्थानीक व तालुक्यातील वेगवेगळया गावातील मजूर व हमाल कामास आहेत.रात्रीला चौकीदारीचे काम करतात रात्रीचे दरम्यान दोन्ही चौकीदार मार्केटमध्ये झोपलेले होते. तर रोशनकुमार परमानंद ठाकुर हा मार्केटचे शेड मधिल आफिस समोर झोपलेला होता.
तसेच इतर हमाल व मजुर आपाआपले खोलीतवेगवेगळ्या ठिकाणी झोपेलेले असताना पहाटे ३:४५ वाचे सुमारास मार्केटचे मागुन प्रथम ४ चोरटयांनी प्रवेश केला व शेडमधिल आशिष मुंदडा यांचे ऑफीस समोर झोपलेला रोशनकुमार परमानंद ठाकुर यास पिस्तुलचा धाक दाखवून ऑफिस कुठे आहे” असे विचारले तेव्हा रोशनकमार परमानंद ठाकूर याने काहीच सांगीतले नाही. तेवड्यात आनखी चोरटे तेथे आले व त्यानी आशिष मुंदडा यांचे तिरुपती सिड्सचे आफिसचे शटर्स व दरवाजा तोडून त्यातील ड्रावर मधील ७.०३.००० रूपये रोख रक्कम व योगेश मुंदडा यांचे खरेदी विकीचे अकाउंट ऑफिसचे ड्रावरमधून ५.५३,०००/ रोख व त्यामध्ये लावण्यात आलेले सिसिटीव्ही फुटेजचे डिव्हीआर मशिन किमत २० हजार रूपये असे पोत्यात टाकुन चोरून चोरटे मार्केटचे मागच्या दारावरून मेहकर मार्गे पसार झाले.घटनेची माहीती मिळताच मालेगांव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन फिंगर प्रिंट तज्ञ, श्वानपथक पाचारण करण्यात आले.त्यानंतर आशिष शामसुदर मुंदडा यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मालेगाव येथे अप क २२० २०२० कलम ३९५भाव सहकलम ८,२५, आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक श्री विजयकमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत केडगे, स्थानीक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी ठाकरे यानी घटनास्थळाला भेट दिली असून त्यांचे मार्गदर्शनात ठाणेदार आधारसिंग सोनोने, सपोनि तान्हाजी गव्हाणे.मालेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत असून सदर गुन्हयातील आरोपीचा लवकरात लवकर शोध लावून गुन्हा उघडकीस आनन्यासाठी पथके गठीत करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचे तपासाकरीता विशेष पथकं गठीत करून आरोपीचे शोध कामी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत अशी माहिती ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी दिली.


