योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
नेरी (१६ जून)- चिमुर तालुक्यातील नेरीला सोमवारच्या रात्रो मेघ गर्जनेसह जोरदार वादळाचा तडाखा दिला. विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी सुद्धा पडल्या. चिमुर तालुक्यात वादळाच्या तडाख्यात नेरी येथील ९२चिमण्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारला रा़त्रो घडली.चिमुर तालुक्यात नेरी येथील छगन सिंह घोंड या व्यक्तिच्या घरच्या लिंबाचा झाडावर शेकडो चिमण्या नेहमीच रात्रो विसावा घ्यायच्या. सोमवार ला अचानक रात्रो वादळ आल्याने निष्पाप चिमण्यांचा बळी गेला. या वादळात ९२ निष्पाप चिमण्यांचा जिव गेला तर पर्यावरण संवर्धन समितीच्या सतर्कतेने काही चिमण्यांना वाचविण्यात यश आले.पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे यांचे मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन समिती सदस्य सुशांत इंदोरकर, सुदर्शन बावने , राहुल गहुकर, मयुर कुंदोजवार यांनी काही चिमण्या मृत्यू च्या दाडेतुन काढले. यामुळे पर्यावरण संवर्धन समिती सदस्यांचे कौतुक केल्या जात आहे. पक्षी प्रेमी कवडू लोहकरे यांची प्रतिक्रिया “आता सध्या पावसाळा सुरु झाला आहे. वादळासह पाऊस पडत आहे. वादळामुळे जर कुठे पक्ष्यांचा मृत्यू होतांना दिसत असेल तर पक्ष्यांना वाचवा. कुठे पक्षी तडफडत असेल तर वाचवा.पक्षी हा पर्यावरणाचा मौल्यवान घटक आहे.”
कवडू लोहकरे
पक्षी प्रेमी नेरी