किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक विजय इंगळे, संजय तायडे, मधुसूदन ढोरे, किरण इंगळे ,रामदास धुळे ,संजय गावंडे ,मनोज बाईस्कर, प्रमोद म्हैसने ,सुनील चव्हाण शाळेतील शिक्षकांनी विविध शैक्षणीक उपक्रम राबवत ,विना घंटीची शाळा, वर्गा बाहेर भाषा विषयांसह दगडावर गणीतीय शिक्षण, कोविड काळात अध्यापना साठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या द्वारात, मधान्ह भोजन करीता विद्यार्थ्यी निर्मित परस बाग, भाजीपाला उत्पादन, वृक्षारोपण सह संगोपन करून वृक्षसंवर्धन सह वृक्षांचे वाढदिवस, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक योजना राबविणे, शंभर टक्के प्रगत विद्यार्थी, ज्ञान रचना वाद पध्दतीने शिक्षण, शालेय शिक्षणा सोबतच विद्यार्थ्यांना कृषी व जल नियोजन शिक्षण , आदी उपक्रम राबविण्यात येतात, या बद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर मॅडम यांनी कौतुक करुन भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा शाळेला सन्मानित केले प्रसंगी शिक्षक संजय तायडे यांना सन्मानित करण्यात आले, प्रसंगी शिक्षण संघर्ष संघटनेच्या संगिताताई शिंदे, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा अशोक भराड ,सल्लागार प्रा चंद्रशेखर म्हैसने, जिल्हा अध्यक्ष प्रकाश हरणे , मुकेश गव्हाणकर ,बाळापूर ता अध्यक्ष धनंजय खेडकर , सचिव एस बी गावंडे , मूर्तिजापूर ता अध्यक्ष दिगंबर भुगुल , सचिव ज्ञानेश टाले , , रोशन विंचूरकर , मनोज बाईस्कर , आर एस बाजोड, व्दारकानाथ चिलवंते, सह आदी शिक्षक उपस्थित होते


