लोकबिरादरी आश्रमशाळेच्या शिक्षणानेच सुरजने घेतली उंच भरारी.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/भामरागड-: भामरागड तालुक्यातील अति दुर्गम नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भाग असलेल्या नारगुंडा या गावातील एक आदिवासी युवक सुरज विष्णु पुगांटी यांनी वैद्यकिय क्षेञात उडी मारल्याने जिल्हा वासियाकरिता अभिमानाची बाब निर्माण झाली आहे.घरची परिस्थिती अत्यंत गरिब.सुरज चे वडील विष्णु पुगांटी हे शेतमजुराचे कामे करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात.आपल्या मुलाला शहरात चांगले शिक्षण देवुन डाँक्टर बनविण्याची ईच्छा होती.माञ घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने सुरज ला शहराच्या ठिकाणी शिकविण्याकरिता त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नसल्याने मुलाचे शहराच्या ठिकाणी शिक्षण होऊ शकले नाही.माञ जवळच असलेल्या हेमलकसा येथील नामांकित लोकबिरादरी आश्रम शाळेत आपल्या मुलाचा प्रवेश घेतला.सुरूवातीपासुनच सुरज ला चांगले शिक्षण मिळाल्याने तो कमी वयातच खुप हुशार झाला होता.त्याची शिक्षणाची प्रगती पाहता त्याला हेमलकसा येथील लोकबिरादरी आश्रम शाळेने त्याला 6 व्या वर्गातच नागपूरला मुंडले पब्लिक स्कूल मध्ये शिकायला पाठवले. त्याची 10 वी पर्यंतची शिक्षणाची,राहण्याची व जेवणाची सोय संस्थे मार्फतीने अशोकवन प्रकल्पात केली. कॉम्प्युटर आणि इंटरनेट ची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली. 10 वीत त्याला 92 टक्के मार्क्स मिळाले होते.नागपुर शाळेतून तो 3 रा नंबर होता. संस्कृत मध्ये त्याने 100 पैकी 100 गुण मिळवले. 10 वी मध्ये शिकत असताना त्याच्या आईचे दुःखद निधन झाले होते.तरीही तो न डगमगता त्याने मनामध्ये शिक्षणाची जिद्द निर्माण करुन अभ्यासाला सुरूवात करून यश संपादन केले.नंतर त्याला पुढिल शिक्षणाकरिता पुण्याच्या ठिकाणी पाठविण्यात आले.लिप्ट फार अपलिप्टमेंन्ट या संस्थे मार्फत त्याला नीट चे फ्री प्रशिक्षण देण्यात आले. त्याची मेहनत आणि शिक्षकांची मेहनत त्याच्या यशाला कारणीभूत आहे. कोरोना लॉकडाऊन मध्ये गेल्यावर्षी तो हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पा मध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास करीत असायचा.त्याने नुकतेच झालेल्या नीट परिक्षेत चांगल्या गुण मिळवुन यश संपादन केली आहे.ही बाब माहीत होताच नारगुंडा येथील पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरिक्षक ज्ञानेश्र्वर लांडे यांनी शनभरही वेळ न लावता त्वरित गाव पाटील बिरजु पुंगाटी यांची भेट घेतली.नारगुंडा गावचे गाव पाटील असलेले बिरजू पुंगाटी यांचा सूरज पुंगाटी हा नातु आहे.याने नुकतेच नीट परीक्षा चांगल्या गुणाने पास केली असून लवकरच त्याला मेडिकल शाखेला प्रवेश मिळणार आहे.त्यामुळे नारगुंडा सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी युवकाची वैद्यकीय क्षेत्रात निवड होणे ही नारगुंडा वासियांकरिता अभिमानाची व गर्वाची बाब आहे.नारगुंडा गावातील तरुणाने त्यांचे कडून बोध घेणे गरजेचे आहे.असे गावातील तरुणांना मोलाचा संदेश देण्यासाठी नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्र्वर लांडे व पोलिसांनी स्वतः बिरजू पुंगाटी यांचे घरी जाऊन सूरज पुंगाटी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व सदर युवकाचे या भरारी मुळे नारगुंडा परिसरातील नागरिकांमध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी प्रभारी अधिकारी ज्ञानेश्र्वर लांडे,पोलीस उपनिरिक्षक मनोहर क्षीरसागर, मयूर पवार व गावातील बिरजू पुंगाटी, दलसू पुंगाटी, कमला पुंगाटी वं कर्मचारी अंकूश धांडे,अमर मोटे, साजण, गणेश, वैभव, गोविंद, इत्यादी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.