दोन आरोपींसह १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल ताब्यात
भद्रावती गुन्हे शाखेची कार्यवाही
महेश निमसटकर
शहर प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.15:–वणीवरून भद्रावती मार्गे चंद्रपूर ला बेकायदा होत असलेल्या दारू तस्करीवर भद्रावती पोलिसांनी लगाम कसून दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची धडाकेबाज कार्यवाही भद्रावती पोलिसा ठाण्यातील स्थानिक गुन्हेशाखे द्वारा दि.१४ जून रोजी दुपारी ३ च्या सुमारास मौजा घोडपेठ येथे करण्यात आली.अजय राजेंद्र राम (२४) आणि अंकित विलास खंडारे (२६) दोन्ही राहणार शांती कॉलोनी,नवीन माजरी जिल्हा चंद्रपूर असे या कार्यवाहीत अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना असी की वणी येथून भद्रावती मार्गे चंद्रपूर ला बेकायदा रित्या अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना गोपनीय सूत्राच्या आधारे मिळाली. या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात भद्रावतीचे पोनी सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनी अमोल तुळजेवार,
पोशी केशव चिटगिरे तसेच शशांक बदामवार आदींनी मौजा घोडपेठ या ठिकाणी नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान एक संशयास्पद पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्र. एम एच ३० ए झेड २२६४ येतांना दिसली.समोर पोलिसांची असलेली नाकाबंदी लक्षात येताच त्यातील इसमांनी आपले वाहन उभे करून पळ काढला.प्रसंगी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेत चौकशी केली.सुरवातीला त्यांनी थातूर मातूर उत्तरे दिली.पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी आपली नावे अजय राजेंद्र राम आणि अंकित विलास खंडारे असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात २५ पेट्या रॉकेट संत्रा देशी दारू ९० एम एल असलेल्या एकूण २५००निपा आढळून आल्या ज्याची एकूण किंमत २ लाख ५० हजार असी आहे.पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि अवैध दारू असा एकूण १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्याविरुद्ध मुदाका अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.


