शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि अकोट
अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात सुरुवात झाली आहे मृग नक्षत्र उजळतात पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद पसरला त्याच बरोबर आता तालुक्यातील व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संत्रा.निबु बागायती पट्ट्यात खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे अकोट तालुका हा बागायती व खारपाणपट्टा अशा दोन भागात विभागलेला आहे बागायती पट्ट्यात पाण्याची सोय असल्यामुळे या परिसरातील शेतकरी पेरणीस लवकर सुरुवात करतात यावर्षी मृग नक्षत्र उधळतात आणि पावसाने हजेरी लावल्यानंतर लगेच पेरणीला सुरुवात करण्यात आली पिंप्री खुर्द परिसरात सद्यस्थितीत काही शेतकर्यांनी पेरणी सुरुवात केली आहे सोयाबीन मूग तूर या पिकांना त्यांनी पहिले प्राधान्य दिल्याचे दिसून आले खारपाण पट्ट्यात मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात होते त्यामुळे सध्या स्थितीत या शेतकऱ्यांची खरी पूर्वमशागत सुरूच आहे अकोट तालुका हा कॉटन बेल्ट म्हणून समजला जातो बहुतेक शेतकरी कपाशीला प्राधान्य देतात परंतु गेल्या काही वर्षात कपाशीवर आलेली बोंडअळी त्यामुळे झालेले नुकसान पाहता आता शेतकरी बोंड आळी व जनावरांचा त्रास होऊ नये यासाठी इतर पिकाकडे वळले असल्याचे लक्षात येत आहे या आठवड्यात पावसाने चांगल्याप्रकारे हजेरी लावली शनिवारी दुपारी सुद्धा अकोट तालुक्यात चांगला पाऊस पडला परंतु अद्यापपर्यंत पेरणीस पाऊस झाला नसल्यामुळे सर्वत्र पेरलेला सुरुवात झाली नसून दमदार पाऊस पडल्यानंतर खारपान पट्टा सर्व इतर भागातील शेतकरी पेरणीला प्रारंभ करणार असल्याचे लक्षात येत आहे


