अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर- (दि ३० ॲाक्टोबर २०२१):-डॅा. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातूर येथे शेषराव खाडे, सचिव, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी महाविद्यालयाचा संपूर्ण आढावा घेतला आणि महाविद्यालयाच्या प्रगतीचे आणि विकासाचे कौतुक केले.शेषराव खाडे यांची महाविद्यालयात ही प्रथमच भेट होती. सचिव या पदावर ते आहेतच परंतु एक उत्कृष्ट साहित्यीक देखील आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत. याकार्यासाठी त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी प्राचार्य डॅा.किरण खंडारे होते. तर प्रमुख अतिथी म्हनुन प्रभाकरराव फुसे, आजीव सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती हे होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतीमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी मा. शेषरावजी खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाज विकासात शिक्षकाची भूमिका ही फार महत्वाची असते असे प्रतिपादन करत शिक्षकाच्या भूमिकेबाबत प्राचीण काळापासून ते आधुनिक काळापर्यंतची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरचं विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करणे देखील गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या साहित्यिक शैलीतून भारतीय संस्कृती, भारतीय सण आणि ते साजरे करण्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांचीच साहित्यकृती असलेल्या ‘निसर्गोपासक कृष्ण’ या पुस्तकाचा आढावा घेत कृष्णाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे असल्याचे प्रतिपादन करीत कृष्णलीला कशा निसर्गोपासक होत्या यावरही त्यांनी प्रकाश टाकला.देशातील बहुतांश समस्यांचे समाधान भारतीय संवीधानात आहे.डॅा पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे संविधान सभेचे जेष्ठ सदस्य होते. त्यांनी
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संविधान सभेत मोलाचे कार्य केले.भाऊसाहेबांच्या या योगदानाचा देखील अभ्यास विचारवंतांनी करावा असे आवाहन करतांना हे देखील सांगितले की,भारतीय संवीधानाच्या प्रास्ताविकेचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे.
यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा.डॅा ममता इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॅा किरण खंडारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषण सोबतचं पाहुण्यांचा परिचय करुन दिला. महाविद्यालयाचा १ एप्रील २०२१ पासुनचा आढावा आणि विकास याबद्दल सांगितले त्याचप्रमाणे भविष्यकालीन विकासाच्या कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन डॅा दिपाली घोगरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा अतुल विखे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


