राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आष्टी – येथील इल्लूर येथे काल दिनांक 31 ऑक्टोबर 2021 महापुरुष जीवन संदेश अभियान अंतर्गत “विचारात परिवर्तन केल्याशिवाय आचरणात परिवर्तन होणार नाही” ह्या विचाराला अभिवादन करून एक दिवसीय युवा प्रशिक्षण शिबीर किसान भवन, ईल्लुर येथे संपन्न झाले.
ह्या देशातील लढवय्या, उत्तम लोकतांत्रिक शासकांच्या कुळातील आदिवासी समाज वर्तमानात स्वतः ची संस्कृती आणि जल, जंगल, जमीन वाचविण्यात अपयशी होतांना दिसत आहे. याचं मूळ कारण समाजाला शत्रू आणि मित्रांची ओळख पटलेली नाही आणि म्हणून आदिवासीची लढाई निरर्थक होत आहे. याला योग्य दिशा मिळावी तसेच आदिवासी समाजाची स्वाभिमानाची लढाई पुन्हा कशी उभी करता येईल याचं प्रशिक्षण प्रशिक्षक राजेंद्र मडावी, मनोज खोब्रागडे यांनी केले. या प्रसंगी उदघाटक नितिन पदा एट्टापल्ली, प्रमुख उपस्थिती डॉ. एस. बी. कोडापे तालुकाध्यक्ष ग्रामसभा चामोर्शी, कालिदास कुसनाके तालुकाध्यक्ष ग्रामसभा मूलचेरा, कोवे महाराज मध्य भारत, गोपीनाथ कोवे अध्यक्ष ग्रामसभा येनापूर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचलन बाळू नारनवरे आणि आभारप्रदर्शन संघशिल बावणे यांनी केले.