नवंमतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन;जिल्हाधिकारी बी.पी पृथ्वीराज
सोनेराव गायकवाड
तालुका प्रतिनिधी, लातुर
लातुर:- येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत नवंमतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये,म्हणून शनिवारी ही रॅली काढण्यात आली आहे.रॅलीच्या माध्यमातून कार्यक्रमाची व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात आहे.जिल्हाधिकारी बी.पी पृथ्वीराज यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून रॅलीला सुरुवात करण्यात आली.२३ किलोमीटर अंतरात तब्बल दोन तास१३ मिनिटे ही रॅली सुरू होती.त्यानंतर दयानंद महाविद्यालय परिसरात रॅलीचा समारोप झाला.या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वनिल पवार,नायब तहसीलदार कुलदीप देशमुख, राजेश जाधव, श्रवण उगले, यांच्या सह सायकलिस्ट लातुर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.