जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर :महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर समाजकार्य विभागाच्या वतीने बीएसडब्ल्यू प्रथम द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मौजे बेलकुंद ता औसा येथे दि. 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी कायदे विषयक मार्गदर्शन शिबिरात हे पथ सादर केले.महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई याच्या परिपत्रकानुसार दि 2 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 कालावधीत राबविण्यात येत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव निमित्त कायदे विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तालुका विधि सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश औसा व वकील मंडळ औसा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमात विशेष उपस्थिती मा. पी आर कुलकर्णी मॅडम अध्यक्ष विधी सेवा समिती औसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी औसा. प्रमुख पाहुणे मा. सुर्यकांत भुजबळ ,गट विकास अधिकारी ,भादा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री नवले साहेब ,अॅड श्रीधर जाधव अध्यक्ष वकील मंडळ औसा. आदी मान्यवर व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यात बालविवाह निर्मूलनासाठी कायदे, जनजागृती आणि बालविवाहाचे दुष्परिणाम यावर माहिती दिली गेली. पथ नाट्य सादर करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सिद्राम डोंगरगे व समाजकार्य विभाग प्रमुख डॉ दिनेश मौने यांचे मार्गदर्शन लाभले .या पथ नाट्यात बीएसडब्ल्यू प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यी कु वाघमारे राधा, शेख मुस्कान, शेख सुमैय्या, भोसले प्रियांका, रसाळ वर्षा, चव्हाण गणेश, देडे खंडु, गोरे वैभव,पवार महेश, शिंदे ओंकार, गोरे प्रथमेश, सुर्यवंशी करण, परताळे लक्ष्मण या विद्यार्थ्यांनी पथ नाट्य सादर केले. या साठी प्रा आशिष स्वामी, प्रा नागेश जाधव आणि परिश्रम घेतले. या सादरीकरणा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सिद्राम डोंगरगे व समाजकार्य विभाग प्रमुख डॉ दिनेश मौने तसेच प्रा काशिनाथ पवार डॉ संजय गवई, डॉ रत्नाकर बेडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.


