शकील खान
अकोला / मुर्तिजापूर शहर प्रतिनिधी
मुर्तिजापूर – स्थानिक आठवडी बाजारात असलेल्या उड्डाणपूला जवळील चौकात नेहमी बाजाराच्या दिवशी व इतर दिवशी सुध्दा वाहतुकीची कोंडी होताना दिसते आहे,लाखपूरी-दर्यापूर,हिरपूर मार्गे भातकुली-अमरावती व भटोरी – म्हैसांग यासर्व मार्गाने येणाऱ्या सर्वांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे उड्डाणपूला वरून जाणारा मार्ग आहे आणि स्थानिकांना तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय,न्यायालय,पोलीस स्टेशन यासर्व ठिकाणी जाण्यासाठी ह्याच चौकातून जावे लागते यामुळे वाहतुकिची कोंडी होताना दिसते आहे अशा वाहतुकीच्या कोंडी मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कदाचित वाहतुक कोंडी दरम्यान एखादी रुग्णवाहिका अत्यावश्यक असलेल्या रुग्णाला घेऊन आली तर त्याठिकाणी ड्रायव्हरला कमालीची कसरत करून रुग्णाला जीवनदान देण्याचा प्रयत्न करावा लागेल ह्याबाबत याआधी सुध्दा प्रसारमाध्यमातुन अनेकदा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या व फेसबुक वर सदर चौकातील वाहतूक गर्दीचा फोटो शेअर केलेला पाहायला मिळाला होता व फोटो खाली याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला होता याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे परंतु ह्या सर्व गोष्टींची सर्वसामान्य लोकानमध्ये फार मोठया प्रमाणात चर्चा सुरू आहे सदर चर्चेवरून पदाधिकारी व संबंधित प्रशासनाने उपस्थित झालेल्या समस्येकडे जातीने लक्ष देऊन होणाऱ्या घटनेवर तोडगा काढण्यात येईल अशी जनसामान्यांना आशा आहे