अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधि मालेगांव
तालुक्यात मान्सून चा दमदार पाऊस झाला असून काही भागातील शेतकरी वर्गाने त्यांच्या शेतात कापूस,सोयाबीन,उडीद, मूग पेरणीस सुरुवात केली आहे.या वर्षी पावसाचे आगमन लवकर व दमदार झाले आणि शेतीची मशागतीचे कामे पण आटोपत शेतकरी वर्गाने उत्साने पावसाचे स्वागत केले.कोरोना मुळे काही दिवस असलेला लॉकडाऊन अन् हताश झालेला शेतकरी वर्ग पावसाचे आगमन होताच आंगवरील मरगळ झटकून पुन्हा नव्या जोमाने अन् नव्या उमेदीने कामास लागला.तालुक्यात सोयाबीन चा पेरा खूप मोठ्या प्रमाणावर असतो.आता काही प्रमाणात कापूस लागवड करण्याकडे सुद्धा शेतकरी वर्ग वळला आहे.मागच्या वर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस आला होता त्यामुळे शेतात उभे सोयाबीन भिजले होते त्याचा दुष्परिणाम म्हणजे या वर्षी सोयाबीन पिकाच्या बियान्याची उगवण क्षमता ही कमकुवत आहे. या दूरदृष्टिकोन लक्षात घेऊन कृषी विभाग मालेगांव यांच्या वतीने गावोगावी जाऊन सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी व ट्रॅक्टर ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्राअंतर्गत शेतकरी वर्गात जागृती अभियान राबविण्यात आले. सोयाबीन बियाणे घराचे असो किंवा बॅग चे असो पेरणी करण्या पूर्वी तपासा अन् पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करून नंतरच पेरा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी शशिकांत जाभरुंकर यांनी शेतकऱ्याना केले.