जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातुर /प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुटुंबातील आई-वडिलांचे संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात मला माझ्या आई-वडिलांकडून वाचनाची प्रेरणा मिळाल्यामुळेच मी आठवीपर्यंतच एकूण ३२ पुस्तकांची ५०७१पाने वाचू शकली यामध्ये डायरी ऑफ ॲन फ्रँकत् मंगला निरगुडकर, गुजरात डायरी राणा अयुब, कोसला भालचंद्र नेमाडे, ड्रिम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा, द रोड कोरर्मेक मॅकार्थी, माय टेल ऑफ फोर सिटीज जयंत नारळीकर( अर्धवट), लोक माझे सांगाती शरद पवार, मी असा घडलो भालचंद्र मुणगेकर, इडली आर्किड आणि मी डॉ.विठ्ठल व्यंकटेश कामत, उरलंसुरलं पु.ल.देशपांडे, मेधा पाटकर सोनाली नवांगुळ, पार अशोक जैन, एक होता कार्व्हर वीणा गवाणकर, एक होता शिक्षक चिंगीन एपटामोव सुमन ओक, निष्कर्ष डॉ.नितीन लवंगारे, अमृत पंथांचे सोबती दिनकर जोशी, बॅरिस्टरचं कार्ट डॉ. हिम्मतराव बावस्कर, माय इंडिया जिम कार्बेट अनुवाद विश्वास भावे, मला निसटलं पाहिजे सलाव्होमिर राविझ अनुवाद श्रीकांत लागू, श्यामची आई साने गुरुजी, दि एडवेंचर ऑफ शेरलॉक होम्स…. सर ऑर्थर कॉनन डायल अनुवाद विलास फडके(२पुस्तके), टागोरांच्या कथा अनुवाद मृणालिनी केरकर, कलाम यांचे बालपण सृजन पाल सिंग अनुवाद प्रणव सखदेव, तेज शलाका इरेना सेंडलर अनुवाद अभिजीत थिटे, साहसी मुले सुरेखा पाणंदीकर, सलाम मलाला संजय मेश्राम, महात्मा फुले विजय शिरगन, जादूच अक्षय पात्र मीरा चक्रपानी, सावित्रीबाई फुले विजय शिरगन, मनगंगेच्या काठावर सबिता गोस्वामी अनुवाद सविता दामले आणि टाटायन गिरीश कुबेर यांचा समावेश असल्याचे प्रतिपादन मॉन्टेसरी महिला विद्यालय, यवतमाळ येथील आठवीची विद्यार्थिनी कु.अनघा घन:श्याम स्वाती दरणे हिने केले सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ती निमित्त महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारा दिवंगत राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ऑनलाइन “वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये “अनघाचे वाचन वेड घेऊ या समजून” या विषयावर ती बोलत होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम एम.डोंगरगे होते तर सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय,यवतमाळ येथील प्राचार्य डॉ.अविनाश शिर्के, प्रा.घन:श्याम दरणे, कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.संजय गवई, डॉ.टी.घन:श्याम आणि प्रा.आशीष स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना कु.अनघा म्हणाली कि, आपण प्रत्येकाने दररोज वाचन केले पाहिजे कारण त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व हे प्रगल्भ बनते. वाचन छंदा सोबतच आपण इतरही आवडी निवडी जपल्या पाहिजे असेही ती म्हणाली. या कार्यक्रमांमध्ये तिला विविध प्रश्न विचारून संवाद साधण्यात आला त्यात सर्व विचारलेल्या प्रश्नांना तिने अत्यंत समर्पक आणि उद्बोधक अशी उत्तरे दिली. या कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, प्राचार्य डॉ.अविनाश शिर्के, प्रा.घन:श्याम दरणे, सौ.स्वाती दरणे, कार्यक्रमाधिकारी डॉ.विष्णू सर यांच्यासह रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेवकांनी तिला संबंधित विषयासंबंधी प्रश्न विचारली व कु.अनघाने सुद्धा विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. सर्वांनी अनघाचे भरभरून कौतुक करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई यांनी केले तर प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमाला महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील स्वयंसेवक, स्वयंसेविका, समाजकार्याचे विभागातील विद्यार्थी व सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथील समाजकार्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होत


