जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातुर /नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, लातूर, रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन, मा.महारत्नदेवी काबरा माहेश्वरी महिला सशक्तिकरण ट्रस्ट, मुंबई व कलापंढरी सेवाभावी संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एम.आय.टी.मेडिकल कॉलेज, लातूर येथील ॲनॅाटॅामी सभागृहात “मोफत २१००० सॅनिटरी पॅड आणि २५ “निसर्ग रक्षक” इन्सीनेटर वितरण समारंभ” उत्साहात संपन्न झाला.
या समारंभाचे उद्घाटन टी.बी.लूल्ला चॅरिटेबल फांऊडेशन, सांगलीचे रो.किशोर लुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जि.प.लातूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.व्ही.काळे, महाराष्ट्र राज्य् माध्यमीक व उच्च् माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग, रोटरी डिस्ट्रीक 3132चे रो.डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती तृप्ती अंधारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी, रोटरी डिस्ट्रीक ३१७० माजी प्रांतपाल सनत अरवडे, नॅब, लातूरचे रो.डॉ.विजयभाऊ राठी, गटशिक्षणाधिकारी संजय पच्चगल्ले, रोटरी क्लब लातूर होरायझनचे अध्यक्ष रो.प्रा.डॉ.संजय गवई आणि कलापंढरी सेवाभावी संस्था, लातूरचे रो.बी.पी.सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना किशोर लुल्ला म्हणाले की, आजचा काळ वेगवान व स्पर्धात्मक आहे. आज विभक्त आणि वैफल्यग्रस्त समाज बनत चालला आहे तेंव्हा सुदृढ समाज निर्मितीसाठी पालकांनी व शिक्षकांनी आपल्या बालकांसाठी वेळ दिला पाहिजे. समाजात दानशूर व्यक्तींनी पण बालकांच्या शिक्षण, आरोग्य व संरक्षण हितासाठी सढळ हाताने मदत केली पाहिजे. आज अशा सहकाऱ्याची फार गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.या प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत येणाऱ्या जि.प.प्रशाला लामजणा, ता.औसा, जळकोट ता.जळकोट, वाढवणा ता.उदगीर, औसा ता.औसा, साकोळ ता.शिरूरअनंतपाळ येथील उत्कृष्ट ०५ शाळांना प्रत्येकी ०१ इनसिनेटर, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांना ०५ इनसिनेटर आणि कलापंढरी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी, गोविंद नगर, बिटरगाव, पानगाव, जळकोट तालुक्यातील वांजरवाडा, माळहिपरगा, उदगीर तालुक्यातील तोंडार, डोंगरशेळकी, नळगीर, वागदरी, एकुरका, गंगापूर, वायगाव, जानापूर, चाकूर तालुक्यातील फरदापुर तांडा या १५ गावांना प्रत्येकी ०१ इनसिनेटर व मोफत सॅनिटरी पॅड देण्यात आले.यावेळी सुधाकर तेलंग, रो.डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे, वर्षा पवार, सनत अरवडे यांनी समायोचित भाषणे केली. या कार्यक्रमात भारतीय स्त्री शक्तीच्या डॉ.ज्योत्स्ना अशोक कुकडे, डी.जी.कार्यालयातील सचिव रो. लक्ष्मीकांत सोनी तसेच इनसिनेटर डिझायनर प्रवीण राठी व उत्पादक रवींद्र माने यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.प्रा.डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार रो.बी.पी.सूर्यवंशी यांनी मानले.या कार्यकर्माच्या यशस्वीतेसाठी सचिव रो.निळकंठ स्वामी, माजी अध्यक्ष रो.डॉ.गोपीकिशन भराडिया, रो.तेजमल बोरा, रो.विठ्ठल कावळे, रो.सुधीर सातपुते, रो.गुणवंत बिरादार, एमआयटी मेडिकल कॉलेजचे विभाग प्रमुख डॉ.फिरोज पठाण, सिद्धाजी पिसाळ, बाळासाहेब फड, माणिक शिरसाट, पुरुषोत्तम उपाळे, आशीष बाहेती, रो.रंजीता वाघमारे, रो.महादेव पांडे, प्रा.रंजीता वाघमारे, रो.प्रतीमा कांबळे, रो.प्रा.विदया आचार्य, रो.प्रसाद वारद, कलापंढरी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते जयवंत जंगापल्ले, सद्दाम शेख, अश्विनी मंदे, बापू सूर्यवंशी, मारुती देवकते, अलका सन्मुखराव, शालू साठे, प्रतिक्षा होनराव, मनोज दवंडे, मधुकर गालफाडे, सुप्रिया रामदासे, शितल तांबोळकर, सुशील मिरकलकर, मुकुंद कुलकर्णी व राहुल बेळकुंदे यांनी सहकार्य केले.