राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आलापल्ली – आज दिनांक 10जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा मार्गदर्शनाखाली आलापल्ली येथे भव्य वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, वेलगुर-आलापल्ली जिल्हा परिषद क्षेत्रप्रमुख कैलाश कोरेत, ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर रामटेके, स्वप्निल श्रीरामवार, मनोज बोलूवार, संतोष अर्का, पुष्पा अलोने, अनुसया सप्पीडवार, माया कोरेत, विशेष भटपल्लीवार, अनिल आयतावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.