सामाजिक उपक्रम राबवून दिला युवकांना मोलाचा संदेश…
आज दि : 10 जून रोजी सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असणारे व गोरगरिबांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारे युवा नेतृत्व
मा.अर्जुनसिंह अजयसिंह गहिलोत यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. वंदनाताई ढोणे ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय पातूर येथे रुग्णांना मास्क, सॅनिटायजर व फळे वाटप करण्यात आला.यावेळी या आयुर्वेदिक महाविद्यालयातील
डॉ. विजय पेंढारकर, डॉ. योगेश नानवटे, आरोग्य सेवक नितिन जाधव, नितिन थुटे,आरोग्य सेविका शीतल बहिरमकार, अश्विनी भगत,आदी कर्मचारी तसेच पत्रकार राजाराम देवकर, देवानंद गहिले, संजय गोतरकार, प्रा.शंकर गाडगे, अविनाश पोहरे, अमोल करवते,पवन तांबे,निरज कुटे, राहुल वाघमारे, अतुल भांगे, तुषार सिरसाट,हर्षल ठक आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या युवा वर्गाने आपले सामाजिक उत्तर दायित्व म्हणून पैशाचा अपव्यय न करता अश्या प्रकारचे गोरगरीबांन साठी सामाजिक उपक्रम राबवावे हा मोलाचा संदेश या उपक्रमातून आजच्या युवा पिढीनी घ्यावा.
संपूर्ण उपक्रम हा सोशल डिस्टंसिंगचे पालन करून करण्यात आला.