अकोला,दि.९ – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १९९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९७ अहवाल निगेटीव्ह, दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर आज एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्येही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८७०(४३२६४+१४४२९+१७७)झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह दोन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३२४६९७ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२१०६९ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२२६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३२४६९७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २८१४३३ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
दोन पॉझिटिव्ह
आज दिवसभरात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिलांचा समावेश असून त्या अकोला मनपा क्षेत्रातील आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.
एक मृत्यू
दरम्यान उपचार घेतांना आज एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस दि.२ पासून उपचारासाठी दाखल केले होते. तिचा आज मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
१६ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८७०(४३२६४+१४४२९+१७७)आहे. त्यात ११३८ मृत झाले आहेत. तर ५६७१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १६ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः १४९ चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.८) दिवसभरात झालेल्या १४१ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरा मुर्तिजापूर येथे एक, अकोला महानगरपालिका क्षेत्रात येथे ११२, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३४ तर हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या अशा एकूण १४९ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.