अकोला : केंद्रीय वित्त मंत्रालयाने पत पोहोच प्रचार मोहिम (Credit Outreach Campaign) राबविण्याचे निर्देश दिले असून या मोहिमेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना विविध पत योजना तसेच कर्ज योजना याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. त्यासाठी गुरुवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता ‘क्रेडीट आऊटरिच अभियान’, हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे फेसबुक व युट्युब वरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
क्रेडिट आऊटरिच अभियान अंतर्गत बॅंकांनी तसेच विविध वित्तीय संस्थांनी आपापल्या क्षेत्रातील तसेच विविध शासकीय योजना तसेच विभागांमार्फत जे अर्थसहाय्य दिले जाते त्याबाबत माहिती लोकांना द्यावयाची आहे. त्यात केंद्राच्या विविध योजना, कृषी, पशुसंगोपन, दुग्ध व्यवसाय, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना इ. सारख्या योजनांमध्ये उदयोन्मुख उद्योजक, व्यावसायिक इ. घटकांना अर्थसहाय्याबाबत तसेच कर्ज पुरवठ्याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे.
ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा सुचना विज्ञान केंद्रामार्फत यु ट्युब वर https://youtu.be/A2Yr2Tp8GRo या लिंकवरुन लाईव्ह केले जाणार आहे. तसेच जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांच्या तर्फे https://fb.me/e/UOA9mDJe या फेसबुक लाईव्ह द्वारे हा कार्यक्रम लोकांना थेट पाहता येणार आहे.
या कार्यक्रमाचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक, आलोक तेरानिया यांनी केले आहे.