अकोला, दि.५ (जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्युट यांचेकरीता क्रीडा नैपुण्य चाचण्यांना आज वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर बुढन गाडेकर, बॉक्सींग प्रशिक्षक सतीषचंद्र भट, कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव, कबड्डी व खो-खो प्रशिक्षक विजय खोकले उपस्थित होते.
आज पहिल्या दिवशी बॉक्सींग खेळाचे एकूण 70 खेळाडू उपस्थित होते. आज खेळाडूंची 50 मीटर, 1 हजार मीटर, 2 बाय 10 मीटर शटल रन, पुशअप, सिटअप चाचणी घेण्यात आली. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे येथे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे येथे चाचणी परत द्यावी लागेल. आजच्या या चाचणीमध्ये सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सींग या खेळाचे तज्ञ म्हणून चाचणीसाठी आदित्य मने, गजानन कबीर यांनी कार्य केले. तसेच निशांत वानखडे, राजू उगवेकर, अनुप वर्मा, अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे, अशोक वाठोरे यांनी चाचणी यशस्वी करण्याकरीता कार्य केले.