अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतनिधी मालेगांव
मेडशी .. दि. ७ मेडशी पासुन काही अंतरावर असलेले वाकळवाडी हे संपूर्ण आदिवासी बहुल गाव आहे या गावाची लोकसंख्या जवळपास तेराशे आहे या गावाला उन्हाळ्या मध्ये पाणी टंचाई भासत होती येथील महिला व लहान मुले मोर्णा नदीच्या डोहातुन एक किलो मीटर वरून पिण्याचे पाणी आणत असत. दरवर्षी प्रत्येक उन्हाळ्यात हीच गत होती.वाकळवाडी गावासाठी नळयोजनेची विहिर होती पण या विहिरीला उन्हाळ्यात पाणी राहात नाही त्यामुळे येथील लोकांचे मोठे हाल होत होते.या साठी आमदार अमित झनक यांच्या प्रयत्नाने तिने वर्षा अगोदर येथे नळ योजना साठी कोळदरा शिवारात विहिर बांधली व पाईपलाईन द्वारे गावातील पाणी पुरवठा विपरीत पाणी सोडले त्या मुळे या वाकळवाडी गावत नळ उन्हाळ्यात घरोघरी पाणी येऊ लागले. अकोला वाशीम महामार्गाचे नविन चार पदरी रोडचे व पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामा मध्ये वाकळवाडी येथील नळ योजनेची पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे मागील तिने महिण्या पासुन गावाला नळयोजनेचा पाणी पुरवठा होत नाही.तर येथील सरपंच जिजाबाई श्रीकृष्ण चाफे यांनी या संबंधी ठेकेदारांना सांगुन सुध्दा फुटलेली नळयोजनेचे पाईप दुरूस्ती केले नाही. त्यामुळे वाकळवाडी वासीयांना पाण्यापासून त्रास होत आहे. तरी सबंधित ठेकेदारांनी फुटलेल्या दुरूस्ती करून द्यावी अशी मागणी येथील सरपंच जिजाबाई श्रीकृष्ण चाफे यांनी केले आहे. अन्यथा या पुलाचे बांधकाम बंद पाडण्यात येईल असा इशारा राजु व्यव्हारे यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.


