अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
दिनांक 2 जून 2021 ते 04 जून 2021 या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे तर दिनांक 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला असला तरी शेतकरी वर्गाने 80-100 मिली मीटर पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये कारण गेल्या वर्षी सोयाबिन उत्पादन कमी झाले होते त्यामूळे बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत.आणि अश्या परिस्थितीत शेतात जर दुबार पेरणी करण्याची वेळ जर शेतकऱ्यां वर आली तर त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण शेतकरी वर्ग कोरोणा महामारी मुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात त्यांनी समय सूचकता दाखवत मुबलक पाणी पडल्या नंतरच पेरणी करावी.अगोदर सोयाबीन, तूर ,उडीद, मूग या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत.सोयाबीन,कापूस ,तूर ,उडीद,मूग ,मका या खरीप पीक पेरणी साठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. आणि सोयाबीन पीक ची पेरणी करताना विशेष करून लक्ष पुर्वक बियाणे जमिनीच्या आत 9 इंच पेक्षा जास्त खोल पडता कमा नये कारण सोयाबीन हे तेल वान असून खूप नाजूक असते जास्त खोल पडल्यास अन् मुसळधार पाऊस झाला किंवा पाऊस लांबला तर सदर बी सडून जाते. त्यामुळे ही खबरदारी घ्यावी.शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये व योग्य वेळी मुबलक पाणी पडल्या वरच पेरणी करावी असे अहवान मेडशी मधील प्रगतशील शेतकरी व प्राध्यापक उल्हासराव मेडशीकर याणी शेतकरी वर्गाला केले आहे.











