निलेश किरतकार
मुख्य संपादक अकोला
अकोला : ऑटोत विसरलेली दागिने असलेली पर्स केली परत
अकोला शहरातील चौका चौकात तैनात असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सर्वसामान्य नागरिकांची रस्त्यावर हरविलेले मोबाईल, पाकिटे, महत्वाचे कागदपत्रे असलेली बॅग्स सापडल्यावर परिश्रम पूर्वक शोध घेऊन परत तर करीत आहेतच परंतु अकोला शहरात प्रचंड संख्येने धावणारे ऑटो चे चालक सुद्धा प्रमाणिकतेचा परिचय देत आहेत, काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात शहरात धावणाऱ्या ऑटो चालकांची मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन करून ऑटोत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या चीजवस्तू नजरचुकीने ऑटोत राहिल्यास आपल्या प्रमाणिकतेचा परिचय देऊन परत करण्याचे आवाहन केले होते व प्रमाणिकतेचा परिचय देणाऱ्या अश्या ऑटो चालकाचा उचित सत्कार करण्यात येईल असे जाहीर केले होते, त्याला उत्तम प्रतिसाद भेटताना दिसत आहे, काल दिनांक 7।6।21 रोजी पंचशील नगर येथे राहणारी श्रीमती आरती मंगेश मोरे ही गरीब महिला काही कामाने बँक ऑफ महाराष्ट्र येथे गेली होती तिच्या सोबत लहान मुलगा सुद्धा होता, तिने त्या मुलाच्या हातात मोबाईल दिला परंतु काम झाल्यावर घाई गर्दीने बाहेर आल्यावर लक्षात आले की मोबाईल बँकेतच राहिला, परत जाऊन मोबाईल चा शोध घेतला परंतु मिळून न आल्याने ह्याची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला करण्यासाठी ऑटो मध्ये बसून सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन मध्ये येऊन तक्रार नोंदवून परत घरी गेली दरम्यान घरी गेल्यावर बऱ्याच वेळाने लक्षात आले की तिची पर्स ज्या मध्ये सोन्याचे मंगळ सूत्र, बेसर अशी दागिने व तिचे व तिच्या नवऱ्याचे मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM कार्ड, बँक पास बुक इत्यादी महत्वाची कागदपत्रे होती ती पर्स ऑटो मध्येच राहून गेली, ही जाणीव होताच त्यांचे पायाखालची जमीन सरकली, एकाच दिवसात मोबाईल व दागिने व मूळ कागदपत्रे असलेली पर्स अश्या दोन वस्तू तिने गमविल्या होत्या परंतु ऑटो चालकाने प्रमाणिकतेचा परिचय देऊन सदर पर्स काल संध्याकाळी वाहतूक शाखेत जमा केली, वाहतूक अंमलदार ह्यांनी श्रीमती आरती मोरे ह्यांचे सोबत संपर्क करून माहिती दिली, आज दिनांक 8।6।21 रोजी सदर हरविलेली पर्स श्रीमती आरती ह्यांना शहर वाहतूक कार्यालयात पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ ह्यांचे उपस्थिती मध्ये परत करण्यात आली त्या वेळी त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, त्यांनी शहर वाहतूक पोलीस व प्रामाणिक ऑटो चालक मोहम्मद हनिफ ह्यांचे आभार व्यक्त केले.
प्रामाणिक ऑटो चालकाचा केला सत्कार
दागिने व महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत करून आपल्या प्रमाणिकतेचा परिचय देणाऱ्या ऑटो क्र MH30 BC1333 चा चालक मोहम्मद हनिफ मोहम्मद इकबाल रा सिंधी कॅम्प ह्याचा पुष्पगुच्छ व रोख बक्षीस देऊन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सत्कार करून कौतुक केले.