सोनेराव गायकवाड
तालुका प्रतिनिधी, लातुर
लातुर:- नोंदणी महानिरीक्षकांनी १२ जुलै रोजी दुय्यम निबंधकांना जारी केलेले जाचक परिपत्रक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी समस्त लातूर संघर्ष समितीच्यावतीने आज दि.१ ऑक्टोंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जनआक्रोश मोर्चा काढून नोंदणी उपमहानिरीक्षक लातूर यांना निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने सर्वपक्षीय व विविध संघटनांचे मोर्चेकरी सहभागी होते.हा मोर्चा भाजप नेते माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते ऍड. अण्णाराव पाटील, प्रहार शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कालिदास माने, समस्त लातूरकर संघर्ष समितीचे समन्वयक रामेश्वर धुमाळ, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर, ऍड. शेखर हवीले, कुलदिपसिंह ठाकूर, ऍड. उदय गवारे,आदीवासी नेते राम राजे आत्राम, राजाभाऊ लखादिवे सरपंच, कलिम सय्यद यांच्या नेतृत्वात हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले १२ जुलै चे परिपत्रक अतिशय अन्यायकारक असून ते रद्द झाले पाहिजे , ज्येष्ठ विधिज्ञ अण्णाराव पाटील या मोर्चाला संबोधित करताना म्हणाले हे परिपत्रक अवघ्या सहा महिन्या चे असून जर हे परिपत्रक रद्द नाही झाले तर आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करू त्यामुळे शासनाने हे परिपत्रक लवकरात लवकर रद्द करावे. प्रदीप पाटील खंडापूरकर या मोर्चाला संबोधित करताना म्हणाले मुळात नोंदणी कायदा हा मोठा आहे परंतु १२ जुलै चे परिपत्रक शून्य किंमत असतांनाही त्याचे पालन होत आहे. तुकडेबंदी कायदा १९८५ पासून झाला तेव्हापासून लाखो रजिस्ट्र्या कशा केल्या तर महाराष्ट्रातील सर्व रजिस्टरवर ४२० गुन्हा नोंद का करुने. प्रहारचे कालिदास माने हे मोर्चा संबोधित करताना म्हणाले की ग्रामीण भागातील मुला मुलींचे लग्न केवळ प्लॉट शेती खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर होत आहेत परंतु परंतु १२ जुलै च्या परिपत्रकामुळे हे सगळे ठप्प झाले आहे. तसेच कुलदीप सिंह ठाकुर, एडवोकेट उदय गवारे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. गेल्या २० सप्टेंबरपासून सर्व दस्त नोंदणीचे काम बंद आंदोलन समस्त लातूर संघर्ष समितीच्यावतीने ३० तारखेपर्यंत सुरु होते. आज भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, नोंदणी महानिरीक्षकाचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा मोर्चात देण्यात येत होत्या.
या मोर्चामध्ये मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रीती भगत, क्षत्रीय मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण देशमुख, लष्कर ए भिमा संघटनेचे रणधीर सुरवसे, महाराष्ट्र विकास कामगार संघटनेचे अमोल जमादार, वीर यौद्धा संघटनेचे श्रीकांत रांजणकर, राष्ट्रवादी सहकार सेलचे सचिन सूर्यवंशी, दगडू हंडरगुळे, लालासाहेब मुळे, वसंत कांबळे पाटील, राजाभाऊ चौगुले लातूर जिल्हा अध्यक्ष, प्रहार जनशक्ती लातूर विधानसभा अध्यक्ष रवि बिजलवाड, उमेश हंडरगुळे,राजाभाऊ लखादिवे, हनुमंत फेरे, रामभाऊ बंडगर, सुनील फुलारी, या शिवाय लातूर जिल्हा रियल इस्टेट संघटना, लातूर जिल्हा कामगार संघटना, मजूर फेडरेशन, बांधकाम युनियन,
दगडू हंडरगुळे. विनोद कोल्हे. डॉ नरसिंह भिकाने. स्वाती जवळेकर . रणधीर सुरवसे. जावेद पठाण. राम पांचाळ. विनोद गुडे कव्हेकर. रामभाऊ पवार. राहुल खंडागळे. भीमाशंकर साळुंखे. जालिंदर बर्डे. विनय जाकते. आनंद कोल्हे. गणेश माडे. प्रकाश पवार. अशपाक कुरेशी.
खोदकाम युनियन आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.

