सोनेराव गायकवाड
तालुका प्रतिनिधी, लातुर
लातुर:- लातूर जिल्ह्यात दि.२१/०९/२०२१ ते २७/०९/२०२१ या कालावधीमध्ये मुसळधार पावसाने (गुलाब चक्रीवादळ ) नुकसान झालेल्या खरिपातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांही शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत,तसेच कांही शेतकरी प्रशिक्षित नसल्याने त्यांना ऑनलाईन अर्ज करण्यात अडचणी येत आहेत.विमा कंपनी शेतकऱ्यांना वयक्तिक अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरा असे म्हणत आहे.गेल्या चार-पाच दिवसांपासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांही भागात दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्यामुळे संपर्काची साधने नाहीत,त्यामुळे विमा कंपनीस ऑफलाईन अर्ज करण्यातही अडचणी येत आहेत.वयक्तिक पंचनामे न करता,सर्वच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून,सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीने ७२ तासांच्या आत विमा मंजूर करावा.व शेतकऱ्यांच्या या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्या. असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना लातुर जिह्याच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक लातुर यांना देण्यात आले आहे. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धर्मराज शिंदे पाटील, माणिकराव गायकवाड, महारुद्र चोंडे, राम नलवाडे, बालाजी शिंदे, सुदाम कदम, राजाराम शिंदे, हिराचंद जैन, गणेश भुजबळ, मारुती रसाळ, मधुकर मायंदे ईत्यादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.











