गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :-तालुक्याचे लक्ष तळेगांव बु.जि.प. मतदार संघाकडे अधिक लागले आहे. दिग्गज उमेदवार मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. नव्याने तयार झालेल्या या मतदार संघात प्रथमच वंचित बहुजन आघाडी ने बाजी मारली होती. मात्र आता पोटनिवडणूक लागल्याने हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी वंचित ची चांगलीच दमछाक होणार आहे. गत निवडणुकीतील समीकरणे आता पूर्णता बदलली आहेत .काही उमेदवार कायम असून काहींना नव्याने उडी घेतली आहे. त्यांनी निवडून येण्यासाठी काही पडापाडीचे राजकारण करण्यासाठी आपली उमेदवारी दाखल केली.हे निकालानंतर स्पष्ट होईल. या मतदारसंघात वंचित कडून जिल्हा परिषद सदस्य संगीता अढाउ. भाजपच्या नयना मनतकार .काँग्रेसच्या अंजुम फिरदोस .राष्ट्रवादीच्या अनिता अरबट .प्रहार च्या शोभा घुगळ या पाच उमेदवार मध्ये लढत होत आहे. ही लढतीत चुरस निर्माण झाली आहे. बाकी चित्रं सहा ऑक्टोंबर रोजी स्पष्ट होईल.