गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :- तालुक्यातील तिन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गण निवडणूकांचे चित्र स्पष्ट झाले असून.कुठे पंचरंगी लढत आहे.तालुक्यात प्रचाराला वेग आला असून. राजकीय वातावरण तापले आहे.मतदार राजा नेमका कुणाच्या बाजूला कौल देणार.यासाठी 6 ऑक्टोंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी दि.5 ऑक्टोंबर मतदान होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 27 सप्टेंबर रोजी काहींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर काहींनी उमेदवारी कायम ठेवली. तालुक्यात आमने-सामने चे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद तळेगाव बु. गटात वंचितच्या संगीता अढाउ कायम असून.त्यांची भाजपच्या नयना मनतकार. प्रहारच्या शोभा घुगंळ. काँग्रेसच्या अंजुम फिरदोस अफरोज खान. राष्ट्रवादीच्या अनिता अरबट .यांच्यासोबत लढत आहे. दानापूर जिल्हा परिषद गटामध्ये दीपमाला रविंद्र दामोदर यांची उमेदवारी वंचित ने कायम ठेवली. त्यांची लढत काँग्रेसचे गजानन पांडुरंग काकड भाजपचे गणेश बापुराव ठाकरे. शिवसेनेचे गोपाल माधवराव विखे. यांच्यासोबत असून अपक्ष वासुदेव कतोरे व प्रहारचे नितीन घायल हे उमेदवार असल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अडगांव बुद्रुक च्या जिल्हा परिषद गटांमध्ये वंचित च्या जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोदीनी गोपाल कोल्हे यांनी पक्षांनी उमेदवारी नाकारत पार्सल उमेदवार दिल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली. त्यांची लढत काँग्रेसच्या खालेदामी गुलाब नबी. भाजपच्या सुषमा श्रीकृष्ण मानकर. शिवसेनेच्या सुवर्णा दिनेश शेगोकार. वंचित च्या सुनंदा काशीराम साबळे यांच्या सोबत रंगणार आहे. ही लढत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे.अडगांव बु.पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या.वंचित च्या खा रफज सुलतान शहीद खा पंचायत समितीच्या सभापती होत्या. मात्र पुन्हा निवडणूक रिंगणात असल्याने समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची भाजपाच्या सुलताना बी अब्दुल रफिक.कॉग्रेस उज्वला काळपांडे.अपक्ष आजमीन बी वसीमोद्दीन .राष्ट्रवादी च्या अब्दुल रजिया.अब्दूल शाहीद. यांच्याशी लढत आहे. वाडी अदमपूर पंचायत समिती मधून वंचित चे अरविंद तिव्हाणे यांची लढत भाजपचे विशाल कोकाटे. काँग्रेसचे दामोदर दही तर अपक्ष जानराव सावंत यांच्या सोबत आहे. भांबेरी येथे भाजपचे सदस्य विलास पार्थिकर यांची लढत वंचित चे अरविंद उमाळे. सेनेचे राहुल गडम तर अपक्ष म्हणून मिलिंद भोजने यांच्यासोबत आहे.










