वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : शिवसेना पदाधिकारी लवकरच मंदिर चालु होत आहे व नवरात्र सुरुवात होत आहे त्या अनुशंघाने माता मंदिरमध्ये पाहणी करण्यास गेले असता तिथे घाणीच साम्राज्य दिसल .. या घाणीत नवरात्र उत्सव साजरा करायचा का 18 सप्टेंबर 2015 ला लोकप्रिय आमदार डॉ. अशोक उइके यांनी राळेगाव शहरात विविध विकास कामाचे भुमिपुजन केले त्यामध्ये मातामंदिर येथे सभामंडपाचे पण पुजन केले पण आज रोजी तेथे सभामंडप सुतगिरणी सारखा दिसला नाही . मग राळेगाव वासीयांना ‘ माता भक्तांना पण सभामंडपाच चॉकलेट होत का हा प्रश्न निर्माण झाला आहे ‘ यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्यागेल्या आहे म्हणून आम्ही लोकप्रिय आमदार ‘ माजी आदिवासी कॅबिनेट मंत्री डॉ. अशोक उइके यांच्या विरोधात तक्रार दाखल करायची का? याचा उलगडा जनतेसमोर झाला पाहिजे . 18 सप्टेंबर 2015 ला राळेगाव वासीयांना भुमिपुजन करून बरेच चॉकलेट आमदार साहेबांनी दिले त्या त्या स्पाट वर जाउन भुमिपुजनाचे शिवसेना काय झाल ते लवकरच जनतेपर्यंत पोहचवेल या वेळी शिवसेना तालुका प्रमुख विनोद काकडे . शहरप्रमुख राकेश राउळकर ‘ संदिप पेन्दोर उपशहरप्रमुख . योगेश मलोन्डे युवासेना शहरप्रमुख महेन्द्र तुमाने . इमरान पठाण शिवसैनिक उपस्थित होते.


