धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल, एसपीना दिले निवेदन
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील एका वृत्तपत्राच्या पत्रकारास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ सप्टेंबर रोजीच्या सकाळी उघडकीस आली, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पिंपळखुटा येथील पत्रकार राहुल देशमुख यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेऊन सोमवारी दि.२७ सप्टेंबर रोजी तक्रार केली आहे. पिंपळखुटा येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक झाली ग्रामपंचायतच्या निवडणुकी मध्ये निवडून आलेल्या सत्ताधारी सरपंच सह सदस्यांचे पायनल प्रमुख यांच्या मुलाने पत्रकारास जिवे मारण्याची धमकी दिली, ग्रामपंचायतच्या विरोधात बातम्या का लावतो या कारणावरून २५ सप्टेंबर रोजीच्या सकाळी १०: २१ वाजता त्या पायनल प्रमुखाच्या मुलाने धमकी दिली, गेल्या काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड देण्यासाठी आलेले सेवानिवृत्त सचिव आर के बोचरे यांना ही या पायनल प्रमुखाच्या मुलाने ग्राम पंचायत मध्ये बेदम मारहाण केली होती.परंतु सदर प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये पिंपळखुटा येथील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी मध्यस्थी करून आपसात केले होते.
चौ
भ्रमणध्वानीवरून दिली धमकी
तुमचे कांड करून टाकील, मारल्याशिवाय राहणार नाही, बोलून करून दाखविल, तुमची तकलीपच दूर करून टाकील, अशा शब्दात २५ सप्टेंबर रोजीच्या सकाळी १०:२१ वाजता पत्रकारास जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
प्रतिक्रिया
गावातील विविध समस्या असल्याबाबत बातम्या प्रकाशित केल्या, ग्रा.पं.च्या विरोधात बातम्या का लावतो, या कारणावरून मला ठार जिवे मारण्याची धमकी दिली, याचा ऑडिओ माझ्याकडे आहे. धमकी देणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी एसपीकडे तक्रार केली आहे.
राहुल देशमुख पत्रकार पिंपळखुटा


