अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मेडशी मंडळाला जणू तीन वर्षापासून ग्रहणच लागलेले आहे. काही केल्या निसर्ग बळीराजाच वाईट च करत आहे.सलग तीन वर्षे झाली मेडशी व परिसरातील शेतकरी ह्या ओल्या दुष्काळा मुळे मेटाकुटीला. नेहमीच अस होत आहे की पेरणी केली तेव्हा महाग मोलाचे सोयाबीन बियाणे विकत घ्यावे लागले त्यात निदन, खुरपन. खतपाणी, डवरण, तणनाशक, कीटकनाशक असा आजकाल अतिरिक्त वाढलेला शेती वरचा खर्च झाला.मात्र एवढं खर्च लागूनही शेतकरी वर्ग या वर्षी मात्र आनंदी होता कारण शेतातील सोयाबिन व तुरीचे असलेले डोलदर पिकामुळे आणि बाजारात सोयाबीनला असलेल्या चांगल्या भावामुळे परंतु जसं जसं सोयाबिन पिकाची काढायची वेळ जवळ येत होती त्यात केंद्र सरकारने ऐनवेळी सोयाबीनची आयात केली त्यामुळे बाजारात अचानक सोयाबिन चे भाव गडाळले आणि त्या भावातही काही अंशी समाधान मानत शेतकरी थोडा फार का होईना आनंदी होता. मात्र निसर्गाने रौद्ररूप धारण केले आणि ऐन सोयाबिन काढणीच्या वेळी अतीमुसळधार आस्मानी संकटाने पावसाच्या रुपाने हजेरी लावली व शेतकरी वर्गाच्या स्वप्नावर पाणी फिरवले.शेतात असलेले चांगलं सोयाबिनचे पीक घरात येण्या अगोदर उभ्या पिकाला कोंब फुटून सडले व त्याची माती झाली.हे असं नेहमीच सलग तीन वर्षा पासून होत आहे त्यामुळे अगोदरच कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकरी वर्ग अजून दिवसे न दिवस कर्जबाजारी होऊन जिवंत असून मरणयातना भोगत आहे. अश्या परिस्थितीत शेती करायची कशी व खायच काय व जगायचं कसं हा भला मोठा प्रश्न मेडशी मंडळा मधील शेतकरी वर्गापुढे ठान मांडून उभा आहे.